मुलीचे अपहरण केल्‍याप्रकरणी नेपाळच्या युवकाला अटक

सदर मुलगी 11 जूनपासून आपल्या घरातून बेपत्ता होती.
मुलीचे अपहरण केल्‍याप्रकरणी नेपाळच्या युवकाला अटक
Nepali youth arrested for abducting girlDainik Gomantak

म्हापसा: थिवी परिसरातील एका मुलीला फूस लावून पळवून नेल्‍याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी 25 वर्षीय मूळ नेपाळच्या युवकाला नाशिक येथून अटक केली आहे. सदर मुलगी 11 जूनपासून आपल्या घरातून बेपत्ता होती.

(Nepali youth arrested for abducting girl)

Nepali youth arrested for abducting girl
दूधसागर धबधबा पर्यटक टॅक्सीसाठी बंद

कोलवाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू अनिल सुनार (रा. आकय-म्हापसा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या मोठ्या बहिणीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. तक्रारीत तिने म्हटले होते की, आपल्‍या बहिणीचे एका अनोळखी व्यक्तीने अपहरण केले असून तिला अज्ञात जागी ठेवले आहे. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

पोलिसांना तपासावेळी या पीडित बेपत्ता अपहरण मुलीचे मोबाईल लोकेशन हे नाशिक-महाराष्ट्रात दाखवत होते. जे अंबाड पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात येते. तेथू जाऊन पोलिसांनी संशयिताला अटक केली. तसेच मुलीची सुटका केली. या दोघांनाही गोव्यात आणण्‍यात आले आहे. या प्रकरणी संशयिताला अटक करण्‍यात आली आहे.

उपनिरीक्षक सोनम वेर्णेकर, हेड कॉन्स्टेबल अजय गावकर, रामा नाईक, सुधीर परब, कॉन्स्टेबल सुलेश नाईक, राजीव नाईक यांनी तपास कामात सहभाग घेतला. त्यांना पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना, उपअधीक्षक जिवबा दळवी व पोलिस निरीक्षक सोमनाथ माजिक यांचे मार्गदर्शन लाभले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com