
पर्वरी : नेरूल पंचायत कार्यक्षेत्रात अलीकडे भरवस्तीत एक मोबाईल टॉवर उभारला आहे. मात्र, या टॉवरला स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. या मोबाईल टॉवरच्या रेडिएशनमुळे लोकांना भयंकर आजाराला सामोरे जावे लागेल, असा दावा करीत गुरुवारी (28) रहिवाशांनी सकाळी 10 वाजता नेरूल पुलाजवळ लोकांना एकत्रित येण्याची साद दिली आहे.
याशिवाय गुरुवारी नेरुल मार्केट बंद ठेवण्याचे आवाहन केले असून, बुधवारी यासंदर्भात गावात रिक्षा फिरवत जागृती करण्यात आली. तसेच लोकांनी यात सहभागी व्हावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
याच टॉवरला विरोध दर्शवत बुधवारी सकाळी स्थानिकांनी या टॉवरच्या प्रतिनिधींना जाब विचारत धारेवर धरले. सदर मोबाईल टॉवर घटनास्थळावरून ताबडतोब हटवावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली. त्यामुळे येथील वातावरण बरेच तंग बनले. काही दिवसांपूर्वी स्थानिकांनी या टॉवर विरोधात निदर्शने करीत या टॉवर उभारणीस विरोध केला होता. कुठल्याही स्थितीत भरवस्तीमधील हा टॉवर हटवावा, असा पवित्रा सध्या स्थानिकांनी घेतला आहे.
यासंदर्भात आमदार केदार नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने पाच हजार टॉवर उभारणीसाठी दिलेल्या परवानगीतील हा एक टॉवर होता. उभारणीपूर्वी स्थानिकांना किंवा पंचायतीला योग्य सूचना देणे गरजेचे होते, मात्र तसे करण्यात आले नाही.
ज्यावेळी खोदकाम सुरू होते, तेव्हा बोअरवेल बांधली जात असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर सदर खड्ड्याचा आकार वाढल्यानंतर शौचालयासाठी ही टाकीची बांधणी केली जात असल्याचे सांगितले गेले. मात्र, एका रात्रीत तिथे मोबाईल टॉवरची उभारणी केल्याचे नाईक म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.