नेत्रावळीचे मैदान गेले वाहून

Dainik Gomantak
शनिवार, 16 मे 2020

पहिलाच पाऊस तास भर पडला अन मैदानावर घातलेली माती पाण्यासोबत वाहून गेली आहे. वास्तविक मातीच्या भरावावर रोलर चा दाब देताना पाणी मारून देणे आवश्‍यक असते. तरच माती घट्ट होत असते.

मनोदय फडते

सांगे

नेत्रावळी येथे कित्तेक वर्षानंतर सातत्याने मागणी केल्यानंतर रखडत रखडत अखेर क्रीडामैदान  प्रकल्प आकारास येत असल्यामुळे स्थानिक युवक उत्साहित झाले आहे.  पण अद्याप काम पूर्ण झालेले नाही मात्र पहिल्याच तास भर पडलेल्या पावसाने क्रीडा मैदानाच्या कामाचे स्वरूप उघड केले आहे. अजून बराच पाऊस येणे बाकी असताना मैदानाची झालेली गत पाहता युवक संताप व्यक्त करू लागले आहेत.
नेत्रावळीतील क्रीडामैदान हे युवकांचे स्वप्न होते. संपूर्ण नेत्रावळी पंचायत क्षेत्रातील एकमेव मैदान असल्याने ते चांगले आणि मजबूत व्हावे ही सर्वांचीच इच्छा आहे. गेली पाचवर्षे झाली मैदान काम रखडत रखडत अंतिम टप्प्यात पोचले आहे. मैदानात घातलेल्या मातीच्या भारावाला दाब हवा तसा मिळाला नाही. पहिलाच पाऊस तास भर पडला अन मैदानावर घातलेली माती पाण्यासोबत वाहून गेली आहे. वास्तविक मातीच्या भरावावर रोलर चा दाब देताना पाणी मारून देणे आवश्‍यक असते. तरच माती घट्ट होत असते. पहिल्या तास भराच्या पावसात माती वाहून गेल्यास पुढील चार पाच महिन्यात पडणाऱ्या पावसात माती वाहून जाणार नाही याची खबरदारी कंत्राटदाराने घेणे गरजेचे आहे.
गेली कित्तेक वर्षे नेत्रावळीत मैदान व्हावे अशी मागणी युवा वर्ग करीत होते पण पहिल्याच तास भर पावसात मैदानाची ही परिस्थिती होत असल्यास पुढील चार महिन्यात काय दशा होईल याचा विचार करून मैदान बांधकाम कंत्राटदाराने त्वरित उपाय योजना करण्याची मागणी सर्वेश नाईक यांनी केली आहे.

 

संबंधित बातम्या