बायणा-वास्कोमध्ये नवा ‘मायक्रो-कंटेन्टमेंट झोन’

बायणा-वास्कोमध्ये नवा ‘मायक्रो-कंटेन्टमेंट झोन’
New ‘micro-contentment zone’ in Bayana-Vasco

वास्को : दक्षिण गोवा (Goa) जिल्हा प्रशासनाने ‘गॅमन इंजिनीयर, बायणा-वास्कोला (Gammon Engineer, Bayana-Vasco) ‘सूक्ष्म-कंटेनमेंट झोन’ (Micro-Contentment Zone) म्हणून घोषित केले आहे. या भागात कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या वाढल्याने त्याचा प्रसार रोखण्यासाठी हे उपाय केले गेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सविस्तर कृती योजना देखील जारी केली आहे. यामध्ये ,संशयितांनी इतर सार्वजनिक आरोग्य उपायांसोबत तपासणी (Checking) आणि चाचणी (Test) करणे, अलगीकरणात ठेवणे, विलगीकरणात ठेवणे, सामाजिक अंतर तपासण्यासह अन्य उपाय योजना जाहीर केल्या आहेत. तसेच वेगवान प्रतिसाद पथकही तैनात करण्यात आले आहेत.

सद्यस्थितीतील परिस्थितीचा प्रतिकार करण्यासाठी ‘मायक्रो कंटेनमेंट झोन’मधील उपरोक्त क्षेत्रातील आजारी व्यक्तींची मोबाईल तपासणीद्वारे आरोग्य तपासणी करून घ्यावी व त्यामध्ये लाल शाईने आजारी असलेल्या व्यक्तीची यादी तयार केली जावी जेणेकरून पुढील आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com