डिचोलीत नवे २५ कोरोनाबाधित रुग्ण

 New 25 in Dicholi Coronary artery disease
New 25 in Dicholi Coronary artery disease

डिचोली : डिचोली तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येत चढउतार होत असून मंगळवारी दिवसभरात तालुक्यात २५ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. डिचोली विभागात ६, मये विभागात ४ आणि साखळी विभागात १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून उपलब्ध झाली आहे.

 
मंगळवारी डिचोली विभागात ४९, मये विभागात ४१ आणि साखळी विभागात ६८ मिळून तालुक्यात एकूण १५८ कोरोनाचे सक्रिय रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. आज तालुक्यातील डिचोलीत ५, मयेत ४, साखळीत १० मिळून १९ रुग्ण बरे झाले आहेत. तालुक्यात केवळ ५ रुग्ण कोविड सुविधा केंद्रात उपचार घेत आहेत, तर डिचोलीत - ४५, मयेत - ३६ आणि साखळीत - ५६ मिळून १३७ रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. डिचोलीतील ३, मयेतील ३ आणि साखळीतील १० मिळून तालुक्यातील १६ रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार चालू आहेत, अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com