New Hotels in Goa : गोव्यात 480 नवीन हॉटेल्सची नोंदणी

पर्यटन खाते सक्रीय; व्यवसाय सुलभतेच्‍या निर्णयानंतर 880 अर्ज
Hotel Mandovi Riviera
Hotel Mandovi Riviera Dainik Gomantak

New Hotels in Goa : बेकायदा व्यवसाय करणारी हॉटेल्स, गेस्ट हाऊस, होम-स्टे आणि लॉजवर कारवाईचे सत्र पर्यटन खात्याकडून सुरू झाले आहे. म्‍हणूनच व्यवसाय सुलभ करण्याच्या निर्णय घेतल्यानंतर ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्‍यांच्‍या कालावधीत हॉटेल्सच्या नोंदणीसाठी 880 अर्ज आले. त्यापैकी 480 अर्ज ग्राह्य मानण्‍यात आले आहेत, अशी माहिती पर्यटन खात्याच्‍या सूत्रांनी दिली.

व्यवसाय सुलभ केल्याने कागदोपत्री व्यवहार कमी झाला असून नोंदणीसाठी मोठ्या संख्येत अर्ज येत आहेत. नोंदणीची प्रक्रिया जटील असल्याने अनेक जण बेकादेशीररीत्या आपला व्यवसाय करत होते. परंतु आता नोंदणीसाठी तीन दस्तावेज केल्यानंतर याचा फायदा स्पष्टपणे दिसत आहे. नवीन नोंदणीसाठी उत्तर गोव्यात 698 अर्ज आले असून 411 नोंद झाले आहे. तर, दक्षिण गोव्यात 182 अर्ज आले असून 42 नोंद झाले आहेत. परवाना नूतनीकरणासाठी एकूण 751 अर्ज आले आहेत. उत्तर गोवा 635 आणि दक्षिण गोवा 116 असे अर्ज आहेत. त्यापैकी 702 अर्जांचे नूतनीकरण करण्यात आले असून उत्तर गोवा 609 आणि दक्षिण गोवा 93 अशी आकडेवारी पर्यटन खात्याने दिली आहे.

Hotel Mandovi Riviera
Ravi Naik : मद्यनिर्मिती प्रकल्पाचे दूषित पाणी ओहोळात सोडल्याने रवी नाईक संतापले

उत्तरेत तीनपट जास्त हॉटेल्स

उत्तर गोव्‍यातील किनारपट्टी भागात मोठ्या संख्येत पर्यटन येतात. परिणामी येथे हॉटेल्स, गेस्ट हाऊस, हो-मस्टे आणि लॉजची संख्या प्रचंड वाढली आहे. दक्षिण गोव्याच्या तुलनेत हे प्रमाण तीनपट जास्त आहे. उत्तर गोव्यात सध्या एकूण 3720 हॉटेल्स नोंद आहेत तर दक्षिण गोव्यात हा आकडा केवळ 918 आहे. हॉटेल्सच्या नवीन नोंदणी आणि परवाना नूतनीकरणासाठी मिळालेले अर्ज देखील उत्तरेत पाचपटीने जास्त आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com