‘जीएसएल’कडून तटरक्षक दलाचे नवीन गस्ती जहाज वेळेआधी पूर्ण

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

‘जीएसएल’कडून तटरक्षक दलाचे नवीन गस्ती जहाज करारानुसार ठरलेल्या वेळेआधी पूर्ण करून सुपूर्द करण्यात आले. १०५ मीटर्स लांब असलेले व अत्याधुनिक यंत्रणांनी युक्त असे हे गस्ती जहाज ‘जीएसएल’मध्ये आयोजित एका छोटेखानी समारंभात तटरक्षक दलाच्या स्वाधीन करण्यात आले. 

वास्को :  ‘जीएसएल’कडून तटरक्षक दलाचे नवीन गस्ती जहाज करारानुसार ठरलेल्या वेळेआधी पूर्ण करून सुपूर्द करण्यात आले. १०५ मीटर्स लांब असलेले व अत्याधुनिक यंत्रणांनी युक्त असे हे गस्ती जहाज ‘जीएसएल’मध्ये आयोजित एका छोटेखानी समारंभात तटरक्षक दलाच्या स्वाधीन करण्यात आले. 

यावेळी गोवा शिपयार्डचे अध्यक्ष कमांडर बी. बी. नागपाल, डीआयजी देवानंद, सीजीआरपीएस डीजी एच. पी. सिंग, कमांडिंग ऑफिसर डीआयजी हरिंदर जीत सिंग आणि दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना गोवा शिपयार्डचे अध्यक्ष कमांडर बी. बी. नागपाल यांनी सांगितले की, कोविड-१९ ने निर्माण झालेली घातक परिस्थिती असूनही वेळेआधी काम पूर्ण करण्याची जीएसएलची परंपरा आमच्या तंत्रज्ञांनी राखली आहे. हे दुसरे ओपीव्ही असून तटरक्षक दलाच्या मागे आम्ही उभे आहोत. यामुळे जहाजनिर्मितीतील आमची क्षमता व कटिबद्धता आमच्या सर्व तंत्रज्ञांनी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

संबंधित बातम्या