गोव्यातील 'कन्नड' समाजाच्‍या घाेषणेमुळे नवा वाद
Mavin GudinhoDainik Gomantak

गोव्यातील 'कन्नड' समाजाच्‍या घाेषणेमुळे नवा वाद

पंचायत निवडणूक: मंत्री गुदिन्‍हो म्‍हणतात, ‘कुणीही उभा राहू शकतो, पण..’

मडगाव: येत्‍या पंचायत निवडणुकीत गोवा कन्नड समाज स्वतःचे उमेदवार उतरविणार आहे. तशी घोषणा गोव्यातील कन्नड नेत्यांनी केल्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वादाला खुद्द पंचायतमंत्री माविन गुदिन्हो ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, त्या दाबोळी मतदारसंघातून सुरूवात झाली आहे. एक वेगळा गट स्थापन करून गोव्यातील अन्य समाजात फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया गुदिन्हो यांनी याबाबत बोलताना व्यक्त केली आहे. गोवा कन्नड महासंघाचे अध्यक्ष सिद्धण्णा मेटी यांनी दोन दिवसांपूर्वी गोव्यातील ज्या भागात कन्नड समाजाचे लोक मोठ्या प्रमाणावर राहतात, तिथे पंचायत निवडणुकीत आम्ही आमचे उमेदवार उतरवू असे म्‍हटले आहे.

त्यानंतर दोनवेळा सांकवाळ पंचायतीचे सरपंचपद भूषविलेले कन्नड महासंघाचे नेते शरण मेटी यांनी यावेळी मोठ्या प्रमाणात कन्नड उमेदवार निवडणूक लढविणार असे जाहीर केले. आपण स्वतः सांकवाळ पंचायतीतून निवडणूक लढविणार असे त्यांनी सांगितले.

Mavin Gudinho
मडगाव बसस्‍थानक बनला मिनी सोनसोडो!

पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्‍हणाले की, जर मतदार म्हणून नोंद झालेली असेल तर त्या कोणालाही निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. हल्लीच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही कुठ्ठाळी मतदारसंघातून असाच एक उमेदवार उभा राहिला होता. हे जरी खरे असले तरी यावेळी जो प्रकार होत आहे तो आपला वेगळा गट उभा करून गोव्यात अन्य समाजात फूट पाडण्‍याचा प्रयत्न दिसतो. तसे असेल तर गोव्यासाठी हे चांगले नव्हे.

आता या वादात अन्य राजकारण्‍यांनीही उडी घेतली आहे. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी बाहेरून आलेल्यांनी आम्ही येथे गोव्यात काय करावे हे शिकवू नये अशी प्रतिक्रिया व्यक्त करतानाच कुडतरी मतदारसंघात असा प्रकार झाल्यास खपवून घेतला जाणार नाही असे म्हटले आहे. तर चर्चिल आलेमाव यांनी, त्यांनी (कन्नड लोकांनी) यापूर्वी आमच्या जमिनी आणि व्यवसाय काबीज केलेले आहेत. आता ते राजकारणही काबीज करायला उठले आहेत अशी प्रतिक्रिया दिली. कृषीमंत्री रवी नाईक यांनी, तुम्ही पंचायतमंत्र्यांनाच विचारा, असे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.