गोवा: जीसीईटी 2021 चे वेळापत्रकात जाहीर

दैनिक गोमंतक
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

गोव्यातील प्रवेश परिक्षांचे नवे शैक्षणिक धोरण २०२१-२२ पासून लागू होणार आहे. असे तांत्रिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे.

पणजी : गोव्यातील प्रवेश परिक्षांचे नवे शैक्षणिक धोरण २०२१-२२ पासून लागू होणार आहे. असे तांत्रिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. अभियांत्रिकी व फार्मसी प्रोग्राम पदवीच्या प्रवेशासाठी जीसीईटी आयोजित केली जाते. त्यासाठीचे वेळापत्रक आयोगाने जाहीर झाले आहे.

असे असणार वेळापत्रक

ही चाचणी ४ मे रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत भौतिकशास्त्राच्या पेपरपासून सुरू होणार आहे. त्याच दिवशी दुपारी २ ते सायंकाळी ४ या वेळेत रसायनशास्त्र या विषयाचा पेपर होईल, तर  ५ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत गणिताचा पेपर घेण्यात येणार असल्याचे डीटीईने सांगितले.

२०२०-२२ या शैक्षणिक वर्षासाठी गोव्यातील बीई, बीफार्म अभ्यासक्रमाचे प्रवेश (गोवा कॉमन एट्रन्स टेस्ट) गोवा बोर्डाच्या बारावीच्या अभ्यासक्रमाच्या आधारे घेतले जातील. गोव्यातील विविध केंद्रांमध्ये बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयाचे पेपर घेतले जातील असे संचालनालयाने सांगितले.

केवळ बीफार्म अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जीसीईटी 2021 वर गणिताच्या विषयाची उत्तरे देण्याची गरज नाही. असे डीटीई च्या सुचनेत म्हटले आहे,

२०२०मध्ये कोरोना या साथीच्या रोगामुळे सर्व देशभर शैक्षणिक वर्ष लांबणीवर पडले.याच पार्शवभूमीवर नवे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ नुकतेच सुरू झाले.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या