Goa Double Track Project|दुहेरी रेल्वे मार्गासाठी नव्याने होणार पर्यावरण आघात मूल्यांकन
पणजी: तिनईघाट ते कुळे या दरम्यानच्या पश्चिम घाटात भारतीय वन्यजीव संस्थेतर्फे दुहेरी रेल्वे मार्गावरील वन्यजीव अधिवास व पर्यावरणावरील आघात मूल्यांकनासाठीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
(New Environmental Impact Assessment for Double Rail Line in goa)
या कामासाठी डेहराडून येथील संस्थेने पर्यावरण आघात मूल्यांकन करण्यात तज्ज्ञ असलेल्यांकडून अर्ज मागविले आहेत. या कामासाठी एक वर्षासाठी नियुक्ती केली जाणार आहे. यावर्षी गेल्या मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने कर्नाटकातील कॅसलरॉक ते गोव्यातील कुळे या दरम्यानच्या दुहेरी रेल्वे मार्गासाठी दिलेला परवाना रद्दबातल ठरविला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.