गोवा बोर्डाचा 10 वी, 12 वीसाठी नवा परिक्षा पॅटर्न

10 वी, 12 वीसाठी सहामाहीच्या दोन परीक्षा, प्रत्येक विषयाच्या परीक्षेचा पेपर दीड तासाचा असेल
गोवा बोर्डाचा 10 वी, 12 वीसाठी नवा परिक्षा पॅटर्न
New examination pattern of Goa Board for 10th and 12th examDainik Gomantak

पणजी: कोविड महामारीच्या (Covid-19) पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने गोवा शालांत मंडळाने (Goa Education Board) पहिल्यांदाच 10 वी 12 वीच्या सहामाहीच्या दोन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक विषयाच्या परीक्षेचा पेपर दीड तासाचा असेल. दहावीची पहिल्या सहामाहीची परीक्षा 1 डिसेंबर 2021 व दुसरी सहामाहीची 4 एप्रिल 2022 पासून, तसेच बारावीची पहिली सहामाही परीक्षा 8 डिसेंबर 2021 व दुसरी 18 मार्च 2022 पासून सुरू होईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेट्ये यांनी दिली.

मंडळाने जारी केलेल्या परिपत्रकात दहावी व बारावीचे शैक्षणिक वर्ष 20-21 साठी गोवा शालांत मंडळाने लेखी व प्रॅक्टीकल परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दहावीसाठी प्रॅक्टीकल परीक्षा 1 मार्च ते 11 मार्च 2022 तर बारावीच्या प्रॅक्टीकल परीक्षा 18 फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहेत. दोन्ही सहामाहीचे परीक्षा शुल्क जमा करण्याची ऑनलाईन प्रक्रिया (पोर्टल) सुरू झाली असून ती 1 नोव्हेंबरपर्यंत खुली आहे. उशिरा शुल्क जमा करण्यासाठी 18नोव्हेंबर तर त्यानंतर 15 नोव्हेंबर 2021 तारीख निश्‍चित केली आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकाचे परिपत्रक सर्व माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांना मंडळाने पाठविले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com