बिहारच्या पाटण्यात उभं राहतंय नवं ‘गोवा’ शहर!

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

गोवा या नावाचे वलय जगभरात आहे. देशभरात या शब्दाचे गारूड आहे. त्यामुळे अनेक उत्पादनांना गोवा नाव दिले जाते. आता चक्क पाटण्यातील एका गृहनिर्माण वसाहतीस गोवा शहर असे नाव दिले गेले आहे.

पणजी :  गोवा या नावाचे वलय जगभरात आहे. देशभरात या शब्दाचे गारूड आहे. त्यामुळे अनेक उत्पादनांना गोवा नाव दिले जाते. आता चक्क पाटण्यातील एका गृहनिर्माण वसाहतीस गोवा शहर असे नाव दिले गेले आहे. एका वेगळ्या प्रकारात ही वस्ती चर्चेत आली आहे. गोव्याबाहेरून येणाऱ्यांसाठी गोवा एक शहर असल्यासारखे वाटते. त्यांना गोवा हे राज्य आहे, 2 जिल्हे, 12 तालुके आहेत हे माहितच नसते. आम्ही गोव्याला गेलो असे ते परतल्यावर सांगतात. पुन्हा गोव्यात येण्याची त्यांनी मनिषा असते. गोवा नावाने त्यांना भुरळ घातलेली असते. एखादी व्यक्ती आपल्या गावाची आठवण कायम ठेवण्यासाठी आपण सध्या राहतो त्या भागाला आपल्या गावाचे नाव देतो.

‘मगो’च्या परिवर्तन यात्राने गोवा विधानसभा निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा

स्वातंत्र्यसैनिक भानुदास पोळजी यांनी पेडणे तालुक्यातील पार्से गावाची स्मृती जागी ठेवण्यासाठी रत्नागिरीतील एका भागाला पार्से स्क्वेअर हे नाव दिले आहे. गोव्याहून पाटणा हे 2 हजार 361 किलो मीटरवरील शहर. पाटणा बिहारची राजधानी. अनेक बिहारी रोजगारासाठी गोव्यात ये-जा करत असतात. त्यांच्यापैकीच कोणीतरी गृहनिर्माण संकुलास गोवा शहर हे नाव दिले की काय हे समजण्यास मार्ग नसला तरी ‘रेरा’ या बांधकाम नियंत्रक यंत्रणेने या संकुलाला नोटीस बजावली आणि पाटण्यातील ‘गोवा शहर’ उभे राहत असल्याची माहिती मिळाली आहे.

मोप विमानतळासाठी धारगळ गावालाही 'प्रकल्पग्रस्त' दर्जा मिळण्याची शक्यता

पाटण्यालगतच्या या संकुलाची पायाभरणी बिहारच्या उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या हस्ते झाली. अर्धा डझन मंत्री, खासदार, चित्रतारे, तारका यांच्या मांदियाळीत या समारंभ झाला. पल्लवी राज कंन्स्ट्रक्शन या कंपनीने या संकुलाचे काम हाती घेतले आहे. गोव्याची प्रसिद्धी ही सुंदर समुद्र किनाऱ्यांमुळे जगभरात झाली आहे. याही संकुलात समुद्र किनारा असेल, असे आश्वासन आज पाटण्यातील विविध दैनिकांत प्रसिद्ध झालेल्या पानभर जाहिरातीतून देण्यात आले आहे.

संबंधित बातम्या