गोवा: चोरांपासून काजू पिकाच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांचा नवा फंडा

दैनिक गोमंतक
शनिवार, 17 एप्रिल 2021

शिरोड्यामधील शेतकऱ्यांनी. चोरांपासून काजू, आंबा पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी नामी शक्कल लढवल्याचे समोर आले आहे.

शिरोडा: वेगेवगेळ्या पद्धतीचे संकट हे शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्यता भाग झालेला आहे. शेतीवर येणारे आस्मानी आणि सुलतानी संकटांवर मात करण्यासाठी शेतकरी प्रत्येकवेळी नवी शक्कल लढवत असल्याचे आपल्याला दिसून येते. अशीच एक क्लुप्ती केली आहे गोव्यातल्या शिरोड्यामधील शेतकऱ्यांनी. चोरांपासून काजू, आंबा पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी नामी शक्कल लढवल्याचे समोर आले आहे. (New Idea of farmers to protect cashew crop from thieves)

साखळी महापालिकेवरील भाजपची सत्ता संपुष्ठात; काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

काजू (kashew), आंबा, कोकम पिकाच्या हंगामात पिकाची चोरी होऊ नये यासाठी दरवर्षी रानात बिबटा तसेच नाग नागीण फिरतात अशा अफवा पिकवून चोरट्यांपासून काजू पिकाचे रक्षण करण्याची नामी शक्कल बागायतीदार करताना दिसतात. बेतोडा, निरंकाल, कोनशे, कोडार, कुर्टी, ढवळी, तसेच बोरी शिरोडा (Shiroda) पंचवाडीच्या बागायतीत तसेच डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर काजूची बने आहेत. या दिवसात काजूचा हंगाम तसेच रानात रानमेवाही मिळत असतो. यावर ताव मारण्यासाठी तसेच काजूबियांची चोरी करण्यासाठी अनेक अज्ञात लोकांची टोळकी फिरतात. काजू बियांना चांगला बाजारभाव मिळतो म्हणून बरेचजण बागायतदारांची नजर चुकवून काजू बिया काढून त्याची परस्पर विक्री करतात हे हे बागायतदार व काजूची पावणी घेणाऱ्यांनाही माहित असते. म्हणूनच काजू, आंबा, फणस, कोकम, आणि बागायती पीक येऊ लागल्यावर दरवर्षी अमुक अमुक रानात बिबटा बछड्यासह फिरतो तसेच नाग आणि नागीण रानात फिरते रानाकडे कोणी जाऊ नका, असे सार्वजनिक ठिकाणी सांगून कानोकानी या अफवा पसरवल्या जातात काही मुले या भीतीने रानात जात नाहीत.(Goa)

 

संबंधित बातम्या