मडगाव, मुरगाव, म्हापसा, केपे आणि सांगे पालिकांच्या प्रभाग आरक्षणाची नविन अधिसूचना जारी

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 16 मार्च 2021

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिका संचालनालयाने आज मडगाव, मुरगाव, म्हापसा, केपे आणि सांगे या पालिकांच्या प्रभाग आरक्षणाची नवीन अधिसूचना जारी केली.

पणजी: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिका संचालनालयाने आज मडगाव, मुरगाव, म्हापसा, केपे आणि सांगे या पालिकांच्या प्रभाग आरक्षणाची नवीन अधिसूचना जारी केली. या नव्या अधिसूचनेनुसार मोठ्या प्रमाणात महिला, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती व जमाती यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या प्रभागांमध्ये फार मोठा बदल झाला आहे.

ही नवी पालिका प्रभाग आरक्षण अधिसूचना जारी करण्यात आली तरी या पालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यासाठी सध्या राज्य निवडणूक आयुक्त नसल्याने पंचाईत झाली आहे. आयुक्तपदासाठी सरकारने कालपासून योग्य व्यक्तीची निवड नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

गोव्यात देशातील पहिले मान्यताप्राप्त सेक्स टॉय स्टोअर, दुकानाच्या भिंतीवर लावले सर्टिफिकेट 

संबंधित बातम्या