गोवा पुनरप्रस्थापित करण्यासाठी नव्या क्रांतीची गरज: विजय सरदेसाई

sardesai 5.jpg
sardesai 5.jpg

मडगाव: एकेकाळी संपन्न सांस्कृतिक परंपरा असलेल्या गोव्याला (Goa) भाजप सरकारने (BJP government) रसातळाला पोहीचविले असून जुनी मूल्ये आणि संस्कृती पुनरप्रस्थापित करण्यासाठी नव्या क्रांतीची गरज असल्याचे मत गोवा फॉरवर्ड पार्टीचे (Forward Party) अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी गोवा क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येस व्यक्त केले आहे.

उद्या गोवा 75 वा क्रांतिदिन साजरा करणार आहे. 75  वर्षांपूर्वी डॉ. राम मनोहर लोहिया (Ram Manohar Lohia) यांनी गोवेकारांना पोर्तुगीज सत्तेविरोधात लढण्याच्या क्रांतीची हाक दिली होती. (New revolution needed to restore Goa Vijay Sardesai)

गोवा मुक्त करण्यासाठी आमच्या पूर्वजांनी मोठा त्याग केला आहे. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आता नवी क्रांती सुरू व्हायला पाहिजे. हा नवा गोवा घडविण्यासाठी  लोकांनी आणि विशेषतः तरुणांनी आपल्या कल्पना मांडाव्यात असे आवाहन करताना 2022 मध्ये गोव्यात 'टीम गोवा'चे सरकार आणण्यासाठी हा प्रयत्न गरजेचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भाजप सरकारने गोव्यातील सांस्कृतिक मूल्यांचा ऱ्हास केला. या सरकारमुळे गोव्याची प्रतिमा रेव्ह संस्कृती असलेले राज्य अशी झाली आहे. ही प्रतिमाच आता बदलण्याची गरज आहे. गोव्याचे पर्यावरण राखण्या बरोबरच आमची वेगळी अशी जी ओळख तयार झाली आहे ती पुन्हा प्रस्थापित करण्याची गरज आहे. कोविडमुळे गोवेकर आर्थिक संकटात सापडला आहे त्यालाही वर काडण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com