संदीप सालेलकर यांना पंचायतीच्या 'सरपंचपदाची' लागली 'लॉटरी'

रिक्त सरपंच पदासाठी अर्ज भरलेल्या संदीप सालेलकर आणि शंकर जल्मी यांना समान मते पडल्याने अखेर 'लॉटरी' पद्धतीचा अवलंब करण्यात आला.
Bicholim  रिक्त सरपंच पदासाठी अर्ज भरलेल्या संदीप सालेलकर आणि शंकर जल्मी यांना समान मते पडल्याने अखेर 'लॉटरी' पद्धतीचा अवलंब करण्यात आला.
Bicholim रिक्त सरपंच पदासाठी अर्ज भरलेल्या संदीप सालेलकर आणि शंकर जल्मी यांना समान मते पडल्याने अखेर 'लॉटरी' पद्धतीचा अवलंब करण्यात आला. Dainik Gomanatak

डिचोली: पिळगाव पंचायतीच्या सरपंच (Sarpancha) पदाच्या निवडणुकीत संदीप दत्ता सालेलकर (Sandeep Salelkar) भाग्यवान ठरले आहेत. त्यांना सरपंच पदाची लॉटरी लागली आहे. रिक्त सरपंच पदासाठी अर्ज भरलेल्या संदीप सालेलकर आणि शंकर जल्मी यांना समान मते पडल्याने अखेर 'लॉटरी' पद्धतीचा अवलंब करण्यात आला. त्यात संदीप सालेलकर हे नशीबवान ठरताना त्यांना सरपंच पदाची 'लॉटरी' लागली. विशेष म्हणजे संदीप सालेलकर यांच्या गटातील एका पंचसदस्याला निवडणुकीस उपस्थित राहता आले नाही. तरीदेखील अखेर नशिबाने साथ दिल्याने सत्ता हस्तगत करण्याचे या गटाचे मनसुबे अखेर सफल झाले.

Bicholim  रिक्त सरपंच पदासाठी अर्ज भरलेल्या संदीप सालेलकर आणि शंकर जल्मी यांना समान मते पडल्याने अखेर 'लॉटरी' पद्धतीचा अवलंब करण्यात आला.
भाजपचे चाणक्य गोव्यात

एक पंच अनुपस्थित

रिक्त सरपंच पदाची निवड करण्यासाठी आज (गुरुवारी) सकाळी पंचायत मंडळाची बैठक घेण्यात आली. बैठकीस सातपैकी उपसरपंच सौ. उर्मिला प्रभूगावकर यांच्यासह संदीप सालेलकर, अनिल नाईक, शंकर जल्मी, प्रदीप नाईक आणि ललना गिमोणकर हे सहा उपस्थित होते. तर एका प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असल्याने पंच स्वप्नील फडते यांना बैठकीस उपस्थित राहता आले नाही.

Bicholim  रिक्त सरपंच पदासाठी अर्ज भरलेल्या संदीप सालेलकर आणि शंकर जल्मी यांना समान मते पडल्याने अखेर 'लॉटरी' पद्धतीचा अवलंब करण्यात आला.
Goa: प्रदेश काँग्रेसच्या निवडणूक कार्यालयाचे माजी मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन

'लॉटरी' द्वारे निवड

सरपंच पदासाठी मावळते सरपंच शंकर (निलेश) जल्मी आणि संदीप सालेलकर या दोघांनी अर्ज भरले. दोन्ही अर्ज ग्राह्य धरल्यानंतर सरपंचांची निवड करण्यासाठी मतदान घेण्यात आले. त्यात श्री. जल्मी आणि श्री. सालेलकर यांना प्रत्येकी 3 अशी समान मते पडली. नंतर उपस्थित पंचसदस्यांच्या मान्यतेनुसार निर्वाचन अधिकारी तथा गट विकास कार्यालयाचे विस्तार अधिकारी भारत महाले यांनी 'लॉटरी'पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. त्यात संदीप सालेलकर भाग्यवान ठरले. निवडणूक प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी पंचायत सचिव मोनाली बेतकीकर यांनी सहकार्य केले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com