दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात २५० खाटांची सोय करणार

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

गोमेकॉ,  डीएचएस आणि कोविड रुग्णालयात काम करण्यासाठी एकात्मिक समूह असेल. ज्यात वैद्यकीय अधिकारी, तज्ञ डॉक्टर, परिचारिका आणि एमटीएस यांचा समावेश असेल. त्याचबरोबर गंभीर रुग्णांना ईएसआय किंवा गोमेकॉमध्ये हलवण्यासाठी दोन रुग्णवाहिका तैनात केल्या जातील.

पणजी: दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय २५० खाटांसह कार्यान्वित करण्याच्या निर्णयासह आरोग्य खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय झाले. 

आरोग्य सचिव निला मोहनन, गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर, कार्यवाहक डॉ. गीता काकोडकर, डॉ. दीपा कोररिया,  डॉ. सुनंदा आमोणकर, डॉ. राजेश पाटील आणि डॉ. मोहनदास पेडणेकर यांची उपस्थिती होती.

या बैठकीत गोमेकॉ,  डीएचएस आणि कोविड रुग्णालयात काम करण्यासाठी एकात्मिक समूह असेल. ज्यात वैद्यकीय अधिकारी, तज्ञ डॉक्टर, परिचारिका आणि एमटीएस यांचा समावेश असेल. त्याचबरोबर गंभीर रुग्णांना ईएसआय किंवा गोमेकॉमध्ये हलवण्यासाठी दोन रुग्णवाहिका तैनात केल्या जातील.

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात रुग्ण हाताळण्यासाठी  कर्मचारी तैनात केले जातील. बेडची कमतरता लक्षात घेता, सर्व अत्यंत आवश्यक नसलेल्या शस्त्रक्रिया थांबविल्या पाहिजेत. तसेच अंतिम वर्षाच्या (नर्सिंग) विद्यार्थ्यांना नॉन-कोविड आरोग्य सेवा केंद्रात नियुक्त केले जाईल. एमसीआयच्या निर्देशानुसार अंतिम वर्षाच्या एमबीबीएस विद्यार्थ्यांना सेवेत सामावून घेतले जाईल.  

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गोमेकॉमध्ये गंभीर कोविड रुग्ण,  ईएसआयमध्ये मध्यम कोविड रुग्ण आणि दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय (एसजीडीएच) किंवा एसडीएच - फोंडा येथे  कोविडची कमी लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातील. 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने या सर्व बाबींची अंमलबजावणी केली जाईल, असे मंत्री राणे यांनी कळविले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या