'जानेवारीपासून गोव्यात नवीन मोटार वाहन कायदा लागू होणार'

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020

जानेवारीपासून अंमलात येणाऱ्या या नवीन मोटार वाहन कायद्यातील मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दंडात्मक रकमेत खूप वाढ करण्यात आली आहे.

पणजी- पुढील वर्षाच्या सुरूवातीला नवीन मोटार वाहन कायदा गोव्यात लागू करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात हा कायदा लागू न करता स्थगित ठेवण्यात आला होता. तशी माहिती वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडून देण्यात आली. 

येत्या जानेवारीपासून अंमलात येणाऱ्या या नवीन मोटार वाहन कायद्यातील मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दंडात्मक रकमेत खूप वाढ करण्यात आली आहे. यामुळे चालकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागण्याची शक्यता आहे. 

संबंधित बातम्या