दरवर्षीप्रमाणेच 'थर्टी फर्स्ट' सेलिब्रेशनसाठी गोव्यात पर्यटकांची गर्दी ; नियमांचं पालन करण्याचं सरकारचं आवाहन

New Year 2021  celebrations in Goa might take a hit this time in view of the corona protocol
New Year 2021 celebrations in Goa might take a hit this time in view of the corona protocol

पणजी :  दरवर्षीप्रमाणेच थर्टी फर्स्ट च्या सेलिब्रेशनसाठी पर्यटकांची पाऊले गोव्याकडे वळली आहेत. अशावेळी वाढत्या कोरोनाचा प्रभाव वाढू नये, याकरिता पर्यटकांनी मास्क घालणे,सोशल डिस्ट्न्सिंग पाळणे तसोच सतत सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असल्याचे गोव्याचे उपमुख्यमंत्री व गोव्याचे पर्यावरणमंत्री मनोहर आजगांवकर यांनी सांगितलं.

भारतात मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २५ हजारांपेक्षाही कमी होती मात्र आज २० हजारांहून अधिक रुग्ण संख्या आढळून आली आहे. अशात इंग्लंडमधून आलेला कोरोनाचा नवा अवतार ७० टक्के अधिक संसर्गजन्य असल्याचेही लक्षात आल्याने रुग्ण संख्या वाढू शकते. याच पार्श्वभूमीवर केंद्राने सर्व राज्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याच्या सूचना दिल्या आहेत.मागील साडेतीन महिन्यांपासून कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र अमेरिका आणि युरोपातील वाढता संसर्ग पाहता खबरदारी घेण्याची गरज असल्याचे केंद्राने राज्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.  नववर्षाचे आगमन आणि स्वागत कार्यक्रम पाहता संभाव्य संसर्ग वाढविणारे सुपर स्प्रेडर कार्यक्रम तसेच अशा ठिकाणांबाबत राज्य सरकारांनी आवश्यक ती उपाययोजना करावी. एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील प्रवासी आणि मालवाहतुकीवर निर्बंध घालण्यात येऊ नये असेही निर्देशांत म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com