बायणा येथे नवविवाहितेची आत्महत्या

आकांक्षाने त्याला ‘मी बेडरूममध्ये झोपते, तू बाहेर हॉलमध्ये झोप’ असे सांगितले. त्यामुळे तो हॉलमध्ये झोपी गेला.
बायणा येथे नवविवाहितेची आत्महत्या
Newlyweds commit suicide at baina Dainik Gomantak

दाबोळी: बायणा येथील एका नवविवाहितेने फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या विवाहितेचे नाव आकांक्षा आनंद पार्सेकर (30) असून ती पतीसमवेत बायणा येथे हाऊसिंग बोर्ड कॉलनीत राहात होती. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Newlyweds commit suicide at baina
भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा दोन दिवस गोवा दौरा..

मिळालेल्या माहितीनुसार, बायणा येथील हाऊसिंग बोर्ड कॉलनीत राहणाऱ्या आकांक्षा पार्सेकर (30) हिने फ्लॅटमधील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा पती आनंद रात्रपाळीचे काम संपवून घरी झोपायला आला असता, आकांक्षाने त्याला ‘मी बेडरूममध्ये झोपते, तू बाहेर हॉलमध्ये झोप’ असे सांगितले. त्यामुळे तो हॉलमध्ये झोपी गेला.

Newlyweds commit suicide at baina
तीन वर्षांच्या मुलासमोर मजुराने घेतला गळफास

दुपारी त्याने बेडरूमचा दरवाजा ठोठावला असता, तो उघडला नाही. आतूनही काहीच हालचाल ऐकू येत नसल्याने शेवटी दरवाजा फोडला असता आकांक्षा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. आनंदने त्वरित पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यांच्या लग्नाला अजून एक वर्ष पूर्ण झालेले नाही. 30 नोव्हेंबर रोजी लग्नाला एक वर्ष पूर्ण होते. आकांक्षाचे माहेर कारवार येथे असून तिचे कुटुंबीय दाखल झाल्यानंतर तिच्या मृतदेहावर संध्याकाळी सहा वाजता बोगदा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com