कासव अंडी घालतात ती किनाऱ्यालगतची बांधकामे हटवा

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

 मांद्रे, मोरजी, आगोंद व गालजीबाग या चार समुद्रकिनाऱ्यावर ओलिव्ह रिडले कासव अंडी घालण्यासाठी दरवर्षी येत असल्याने तेथील जागा मोकळी ठेवण्यासाठी उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे काढण्याचा आदेश जीसीझेडएमएने जारी केला होता. या आदेशाला काही बांधकामधारकांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे आव्हान दिले होते.

पणजी-  मोरजी, आगोंद व गालजीबाग समुद्रकिनाऱ्यावर ज्या जागेत कासव अंडी घालण्यास येतात तेथील सर्व बांधकामे हटविण्याचा गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (जीसीझेडएमए) दिलेल्यावर आदेशावर राष्ट्रीय हरित लवादाने शिक्कामोर्तब केले. कासव अंडी घालतात तेथील जागेत कुंपण उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 मांद्रे, मोरजी, आगोंद व गालजीबाग या चार समुद्रकिनाऱ्यावर ओलिव्ह रिडले कासव अंडी घालण्यासाठी दरवर्षी येत असल्याने तेथील जागा मोकळी ठेवण्यासाठी उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे काढण्याचा आदेश जीसीझेडएमएने जारी केला होता. या आदेशाला काही बांधकामधारकांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे आव्हान दिले होते. लवादाने जीसीझेडएमएने दिलेला आदेश कायम ठेवत या किनारी उभारण्यात आलेल्या बांधकामासह तेथील सनबेडस् व शेडस् हटविण्यात यावेत. ही सर्व बांधकामे कासव समुद्रकिऱ्यावर अंडी घालण्यास पुढील महिन्यात नोव्हेंबर महिन्यात येण्यापूर्वी हटविण्यात यावीत. ज्या जागेत ते अंडी घालतात तेथे कुंपण उभारण्यात यावे त्यामुळे या समुद्रकिनाऱ्यावर लोकांना फिरता येता कामा नये. कासव अंडी घालण्याचा मोसम नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये सुरू होऊन तो मार्च - एप्रिलपर्यंत सुरू असतो त्यामुळे या काळात कासवांना त्रास होऊ नये असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
 

संबंधित बातम्या