पत्राद्वारे खंडणीची तक्रार बनावट असल्याचे स्पष्ट : अधीक्षक वाल्सन

व्हिएतनाममधील व्‍हॉट्सॲप स्रोताचा शोध सुरू
Nidhin Valsan
Nidhin ValsanDainik Gomantak

उत्तर गोव्यातील स्टार हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि क्लब मालकांकडून काही लोक मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासाठी पैसे गोळा करत असल्याची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली असल्‍याचे एक वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पत्राच्या अनुषंगाने गुन्हे शाखेने चौकशी केली असता ते बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मूळ व्हिएतनाम येथून व्‍हॉट्सॲपद्वारे हे पत्र व्हायरल झाले. यात सह्यांव्यतिरिक्त तक्रारदारांची नावे नाहीत. त्यामुळे त्याची सत्यता पडताळता आली नाही. या प्रकरणाची चौकशी सायबर क्राईम कक्षामार्फत सुरू असून त्याचा मूळ स्रोताची चौकशी सुरू आहे, असे पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी सांगितले.

Nidhin Valsan
MLA Disqualification: आमदार अपात्रता सुनावणीची तारीख पे तारीख

व्हिएतनाम येथील +84334364121 या व्‍हॉट्सॲप क्रमांकावरून संबंधित पत्र व्हायरल झाले. 16 मार्च रोजी विविध क्रमांकावरून ही तक्रार पाठवण्यात आली होती. त्यामुळे सायबर क्राईम कक्षामार्फत या क्रमांकाचा शोध घेण्यात येत आहे.

नंद गोपाल कुडचडकर यांनी पर्वरी पोलिस स्थानकात तर साहिल अडवलपारकर यांनी पणजी पोलिस स्थानकात तक्रारी दाखल केल्या आहेत. या बोगस तक्रारीतील सह्या असलेल्यांची नावे अस्पष्ट होत आहेत. ही तक्रार निनावी असून त्यावर फक्त सह्या आहेत.

Nidhin Valsan
Prashasan Tumchya Daari : लोकं म्‍हणतात, प्रशासन दरदिवशी यावे दारी!

त्यातील तक्रारदार ओळखण्यापलीकडे आहेत. त्यामुळेच काही सायबर गुन्हेगारांनी ही बोगस तक्रार तयार करून व त्यावर काहींचे नाईट क्लब वा रेस्टॉरंट्स असलेल्यांच्या आडनावाने खोट्या सह्या केलेल्या आहेत.

काही सायबर गुन्हेगारांनी किंवा असंतुष्ट लोकांनी गोवा सरकार आणि गोव्याचे मुख्यमंत्री यांची बदनामी करण्यासाठी केले आहे असे दिसते, असे अधीक्षक वाल्सन यांनी सांगितले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com