गोव्यात नाईट कर्फ्यू लागू. काय सुरु? काय बंद?

दैनिक गोमंतक
गुरुवार, 22 एप्रिल 2021

मंगळवारी गोव्यात 26 लोकांचा  कोरोनामुळे मृत्यू झाला हे आतापर्यंतचे एका दिवसात झालेले सर्वाधिक मृत्यू आहेत.

मंगळवारी गोव्यात 26 लोकांचा  कोरोनामुळे मृत्यू झाला हे आतापर्यंतचे एका दिवसात झालेले सर्वाधिक मृत्यू आहेत.  त्याच अनुषंगाने गोवा सरकारने बुधवारी रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अनेक निर्बंधांची घोषणा केली आहे. नवीन नियमांनुसार विवाह सोहळ्यासाठी 50 लोक उपस्तिथ राहू शकतात. तसेच अंत्यविधी साठी 20 लोक उपस्तिथ राहू शकतात. गोव्यामध्ये सध्या 9300 सक्रिय रुग्ण असून 1502 नवीन रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात 17 मृत्यूची नोंद झाली असून त्यात एक 27 वर्षीय तरुण आहे.(Night curfew imposed in Goa. What started What's off)

मुबलक पशुधन असूनही राज्यात दुधाचा तुटवडा; दूध उत्पादन योजनाही फोल 

गोवा सरकारने कोणते निर्बंध घातले आहेत?
राज्यात कोरोना रुग्णाची संख्या अचानक वाढत असल्याचे सांगून गोवा सरकारने 21 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान राज्यात रात्रीचा कर्फ्यू लागू केला आहे. रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत कोणत्याही हालचाली किंवा लोकांना एकत्र येण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तथापि, त्यांनी हे स्पष्ट केले की अत्यावश्यक सेवा, किराणा सामान, दुध इ. वाहतूक करणार्‍या वाहनांना तसेच अन्य राज्यातून गोव्यात येणाऱ्यांना रात्रीच्या कर्फ्यूच्या वेळी परवानगी दिली जाईल आणि तातडीची वैद्यकीय सेवा देखील दिली जाईल. कलाम 144 नुसार राज्यात पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रमोद सावंत यांनी जनतेला घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. 30 एप्रिल रोजी निर्बंधाचे पुनरावलोकन केले जाईल, असे सावंत म्हणाले.  

काय बंद राहणार?

1) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ऑफलाइन परीक्षा वगळता शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था बंद राहतील.

2) राज्य शिक्षण मंडळामार्फत येत्या 24 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या बारावी व दहावीच्या परीक्षा तहकूब करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की नवीन परीक्षेच्या तारखा किमान 15 दिवस अगोदर जाहीर केल्या जातील.

3) जलतरण तलाव बंद करण्यात आले आहेत आणि कोणत्याही सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक किंवा शैक्षणिक किंवा सांस्कृतिक मेळाव्यास परवानगी दिली जाणार नाही. राज्यातील स्पोर्ट्स क्लबनी या कालावधीत ठरविण्यात आलेली त्यांची स्पर्धा रद्द करावी आणि साथीच्या आजाराला कमी करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करण्यास सांगितले गेले आहे.

गोमंतकीयांनो सावध रहा!  राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 1500 हून अधिक रुग्णांची नोंद 

कोणत्या कार्याला परवानगी दिली जाईल?

1) कॅसिनो, बार, रेस्टॉरंट्स, रिव्हर क्रूझ, वॉटर पार्क, एन्टरटेन्मेंट पार्क, व्यायामशाळा, स्पा, मसाज पार्लर, सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट बसेस यासारख्या संस्थांना 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. आयपीसीच्या कलम 188 अन्वये नमूद केल्यानुसार या सेवेचे उल्लंघन करणार्‍यांवर जिल्हा प्रशासन कारवाई करेल, ज्यात एखाद्या व्यक्तीने काढलेल्या आदेशाचे उल्लंघन केले तर, एक महिन्यापर्यंतचा साधा कारावास किंवा 200 रुपये दंड किंवा दोघांचा समावेश आहे.

2) मंदिरे, मशिदी, चर्च आणि मठ यासारख्या उपासनास्थळांना त्यांचे दैनंदिन विधी पार पाडण्याची परवानगी दिली जाईल.  मात्र मोठ्या प्रमाणात मेळावे घेण्यास बंदी घातलेली आहे. कोणत्याही प्रकारच्या सामूहिक प्रार्थना घरी केल्या जाव्यात असे आदेशात म्हटले आहे.  

3) 50 जणांमध्ये विवाहसोहळा करण्यास परवानगी देण्यात आली असून 20 जणांमध्ये अत्यंसंस्कार करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. या दोन्ही गोष्टींसाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी घेणे गरजेचे असल्याचे सावंत यांनी सांगितले. 

4) 23 तारखेला होणाऱ्या पाच नगरपरिषदांच्या मतदानासाठी मतदानाच्या ठिकाणी  मास्क घालणे, सामाजिक अंतर ठेवणे तसेच सॅनिटायझर्स वापराने बंधनकारक असणार आहे. तस्वेच सरकारी व खासगी कार्यालयांना घरूनच काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

संबंधित बातम्या