...तर ती जबाबदारी ‘जेट पॅचर’ कंत्राटदाराची!

नीलेश काब्राल : डागडुजी करूनही पुन्हा खड्डे पडले तर बिल देणार नाही
Nilesh Cabral
Nilesh CabralDainik Gomantak

पणजी : रस्त्यावर पडलेले खड्डे जर ‘जेट पॅचर’ या मशीनद्वारे बुजविण्यात आले व दीड वर्षाच्या आत पुन्हा त्या ठिकाणी कोणत्याही तांत्रिक कारणाविना खड्डे पडले तर ते बुजवण्याची जबाबदारी ही त्या कंत्राटदाराची आहे. त्यासाठी त्याला वेगळे बिल दिले जाणार नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.

गिरी - म्हापसा येथे रस्त्याखाली असलेली पाण्याची पाईपलाईन फुटल्याने तेथील रस्त्यावर मोठे खड्डे पडून हा रस्ता दबला गेला. ही पाईपलाईन जुनी असून रस्त्याच्या मधोमध आहे. ती तेथून बाजूला स्थलांतर करणे आवश्‍यक आहे. रस्ता दुरुस्त केला तरी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे ही भिड्याची पाईपलाईन पुन्हा फुटत राहणार आहे.

Nilesh Cabral
‘ग्रेटर पणजी’ अखेर निकालात

बांधकाम खात्यातील नोकरभरती रद्द करण्यात आल्याने अनेक उमेदवारांना त्याचा मानसिक त्रास झाला आहे, यासंदर्भात विचारले असता मंत्री काब्राल म्हणाले की, नव्याने या पदांसाठी जाहिरात दिली जाणार आहे. नोकरभरती प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती कारण उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली नव्हती. ही प्रक्रिया रद्द करण्याचा किंवा ठेवण्याचा हा निर्णय सरकारचा आहे. जर उमेदवार स्मार्ट असतील व त्यांना चांगले गुण मिळाले होते तर त्यांनी पुन्हा जेव्हा जाहिरात येईल तेव्हा अर्ज करावेत.

बांधकाम खात्यात कनिष्ठ अभियंत्याची पदे भरताना अनेक त्रुटी ठेवण्यात आल्या होत्या. सध्या बांधकाम खात्यात मुख्य अभियंता पद रिक्त आहे. अभियंता अधीक्षकांना या पदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. त्यामुळे या खात्यात ‘खतखते’ झाल्याची खंत मंत्री काब्राल यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com