स्थानिक स्वराज्य संस्थांवर राजकीय दबाव नको: निळकंठ हळर्णकर

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

माझ्या थिवी मतदारसंघातील पंचायतींवर वर्चस्व ठेवण्यासाठी फोडाफोडीचे राजकरण करणे मला आवडत नाही. कुणीतरी पंचायतसदस्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करीत असल्यास त्यालाही माझा आक्षेप नाही. 

म्हापसा: पंचायत मंडळे विमुक्त असावीत, अशी माझी ठाम भूमिका असू्न स्थानिक स्वराज्य संस्थांवर कुणाही राजकारण्यांचा दबाव असूच नये, असे मत थिवीचे आमदार निळकंठ हळर्णकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

कोलवाळ पंचायतीवर स्वत:चे वर्चस्व राहावे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याच्या वृत्तासंदर्भात त्यांना छेडले असता ते म्हणाले, की तसे करण्याची माझी प्रवृत्तीच नाही. जे कोण पंचायतींवर निवडून येतात ते सर्व जण माझीच माणसे आहेत, या भावनेतून मी प्रत्येकाकडे पाहतो. त्यामुळे, माझा समर्थक अथवा विरोधक असा दुजाभाव मी कदापि करीत नाही. मी आतापर्यंत निकोप वृत्तीने राजकारण करीत आलो आहे. त्यामुळे, माझ्यावर कुणी टीका केली तरी मी त्याबाबत वचपा काढण्याचा कदापि प्रयत्न करीत नाही.

माझ्या थिवी मतदारसंघातील पंचायतींवर वर्चस्व ठेवण्यासाठी फोडाफोडीचे राजकरण करणे मला आवडत नाही. कुणीतरी पंचायतसदस्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करीत असल्यास त्यालाही माझा आक्षेप नाही. 

आमदाराची निवड पंचसदस्य करीत नाहीत, तर मतदारसंघातील तमाम जनता करीत असते, असेही श्री. हळर्णकर म्हणाले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या