डिचोलीत कोरोनाचे नवे नऊ रुग्ण

दैनिक गोमंतक
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

डिचोली तालुक्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असून,  आज शुक्रवारीही  तालुक्यात रुग्णसंख्येत घट झाल्याचे आढळून आले आहे. 

डिचोली  डिचोली तालुक्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असून,  आज शुक्रवारीही  तालुक्यात रुग्णसंख्येत घट झाल्याचे आढळून आले आहे. 

आज तालुक्यात केवळ नऊ नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. तर डिचोलीतील कोविड सुविधा केंद्रात आजही एकही रुग्ण नसल्याची माहिती मिळाली आहे. आज मये विभागात केवळ एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला. तर  डिचोली आणि साखळी  विभागात प्रत्येकी ४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत.

अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून उपलब्ध झाली आहे. शुक्रवारी डिचोली विभागात ३६ मये विभागात ३२ आणि साखळी विभागात २९ मिळून तालुक्यात एकूण ९७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. आज तालुक्यातील  डिचोली विभागात ३ आणि मये विभागात १ मिळून ५ रुग्ण बरे झाले आहेत. डिचोलीत-33 मयेत-32 आणि साखळीत-२५ मिळून ९० रुग्णांना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या