
Goa Forests Fire : गोव्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेले अग्नितांडव थांबण्याचे नावच घेत नाही. जंगलात लागलेली ही आग नियंत्रणात आणण्यासाठी आता नौदल आणि हवाई दलही पुढे सरसावले आहे.
दोन लष्करी हेलिकॉप्टरने काल (रविवारी) सकाळपासून गोव्याच्या जंगलातील आगीमुळे प्रभावित झालेल्या प्रदेशांवर हजारो टन पाणी सोडणे सुरूच ठेवले आहे.
काल भारतीय हवाई दलाने त्यांची दोन Mi-17 हेलिकॉप्टर तैनात केली आहेत, ज्यांनी 4 उड्डाणे केली आणि प्रभावित भागात 48600 लिटर पाणी वितरीत केले. राज्य सरकारी यंत्रणेच्या मदतीने, हेलिकॉप्टर 4 भागात आग विझवण्यात यशस्वी झाले आहे.
रविवारी संध्याकाळपर्यंत, वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण आठ ठिकाणी आगी सक्रिय होत्या आणि सुमारे 450 हून अधिक स्वयंसेवक संयुक्त अग्निशमन ऑपरेशनमध्ये तैनात करण्यात आले होते. दरम्यान, वनमंत्री विश्वजित राणे यांनी जंगलातील आगीबाबत अपडेट्स पोस्ट करणे सुरू ठेवले आहे.
दरम्यान, वनविभागाने गोवा पोलिसांशी संपर्क साधला आहे आणि अधिक कर्मचारी तैनात करून मदत करण्यास सांगितले आहे; जेणेकरुन जंगलात आग लावण्यापासून गैरप्रकारांना परावृत्त करता येईल.
विभागाने उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यांतील पोलिस अधिकार्यांना औपचारिकपणे पत्र लिहून त्यांच्या संबंधित अधिकारक्षेत्रातील वनक्षेत्रात अधिक कर्मचारी तैनात करण्याची विनंती केली आहे.
5 मार्चपासून गेल्या आठवडाभरात गोव्यात पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील म्हादई वन्यजीव अभयारण्य, नेत्रावली वन्यजीव अभयारण्य आणि इतर राखीव वनक्षेत्रांमध्ये अभूतपूर्व वणव्याच्या घटना घडल्या आहेत.
स्थानिक लोक आणि वन कर्मचारी तसेच स्वयंसेवकांसह लष्करी विमानाने केलेल्या हवाई अग्निशमनामुळे आग विझवण्यात यश आले, परंतु नवीन भागात आग लागण्याच्या घटना सुरूच आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.