'एनडीए'चे नेते म्हणून नितीश कुमार पुन्हा बनणार मुख्यमंत्री

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

  बिहारमध्ये पार पडलेल्या एनडीएच्या बैठकीत नितीशकुमार यांनाच एकमताने एनडीएचा नेता म्हणून निवडण्यात आलं. आता नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा शपथ घेतील.

पाटणा :  बिहारमध्ये पार पडलेल्या एनडीएच्या बैठकीत नितीशकुमार यांनाच एकमताने एनडीएचा नेता म्हणून निवडण्यात आलं. आता नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा शपथ घेतील. भाजपचे सुशील कुमार मोदी यांच्यावर बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. नितीशकुमारांचा शपथविधी उद्या होण्याची शक्यता आहे.

एनडीएची ही बैठक पाटण्यातील नितीश कुमारांच्या घरी घेण्यात आली. आज झालेल्या एनडीएच्या बैठकीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेदेखील उपस्थित होते. बैठकीनंतर एनडीएने राज्यपाल फागू चौहान यांच्यासमोर सत्तास्थापनाचा दावा केला. राज्यपालांनीही नितीश कुमार यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिले आहे. 

संबंधित बातम्या