‘त्या’ फळ विक्रेत्यांवर कोणतीच कारवाई नाही

मुरगाव पालिकेच्या कारभारावर संशय
‘त्या’ फळ विक्रेत्यांवर कोणतीच कारवाई नाही
Mormugao municipal council Dainik Gomantak

वास्को : मुरगाव नगरपालिकेतर्फे वास्को मासळी मार्केट व्यावसायिकांबरोबर फळ, भाजी विक्रेत्यांचे देव दामोदर ट्रस्ट जागेत तात्पुरते मार्केट उभारून स्थलांतर करण्यात आले. मात्र अजूनही अनेक अडथळे दूर होणे बाकी आहे.

सोमवारी पालिकेतर्फे तात्पुरत्या मार्केटमध्ये जाणाऱ्या मार्गावरील बेकायदेशीर अतिक्रमण केलेली फळ, भाजी दुकाने हटवण्यात आली. परंतु तेथे असलेल्या दोन फळ विक्रेत्या दुकानांवर कारवाई केली नसल्याने पालिकेच्या कारभारावर संशय निर्माण झाला आहे.

Mormugao municipal council
पर्वरीत 2.5 लाखांचा ड्रग्ज जप्त; एकास अटक

वास्को मासळी मार्केट येथील देव दामोदर ट्रस्टमध्ये स्थलांतर केल्यानंतर येथे मासळी, फळ-भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांना मार्केटमध्ये जाताना त्रास सहन करावा लागत आहे. मार्केटमध्ये जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेकायदेशीर फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले होते.

सोमवारी पालिकेचे निरीक्षक, कनिष्ठ अभियंता एस. कुडणेकर, शहर नगरसेविका शमी साळकर, नगरसेवक गिरीश बोरकर व पालिका कामगारांनी अतिक्रमण केलेल्या बेकायदेशीर हातगाड्यांवर व रस्त्यावर बसणाऱ्या फळ विक्रेत्यांवर कारवाई केली. मात्र तात्पुरत्या मार्केटमध्ये येताना मुख्य दोन फळगाड्यांवर कारवाई केली नसल्याने कारवाई केलेल्यांनी पालिकेच्या कारभारावर संशय व्यक्त केला.

देव दामोदर ट्रस्टच्या बाजूस असलेले सर्व फळ विक्रेते

बेकायदेशीर असून, सर्वांवर कारवाई होणे गरजेचे होते. मात्र पालिकेने तसे न करता कारवाई फक्त रस्त्यावर बसणाऱ्या फळ व हातगाड्यांवर केली. कायदा सर्वांसाठी एक असून, पालिकेने आपली कारवाई

इमानदारीने करावी, अशी मागणी हटवण्यात आलेल्या फळ विक्रेत्यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com