ऑनलाईन शिक्षणाची सक्ती नाही

CM
CM

पणजी

लोक जागोजागी मोबाईल मनोऱ्यांना विरोध करीत आहेत. यामुळे राज्यात सगळीकडे मोबाईलची रेंज मिळत नाही. त्‍यामुळे सर्व ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य होत नाही. याला मोबाईल मनोऱ्यांना विरोध करणारेच कारणीभूत आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. ऑनलाईन शिक्षणाची सक्ती केलेली नाही, असेही त्यांनी याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर स्पष्ट केले.
ते म्हणाले, मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या मनोरे उभारण्यासाठी गावोगावी जात होत्या. त्या मनोऱ्यांना विरोध करणारे हे लोकच होते. तेच आज मोबाईलची रेंज नाही, त्यामुळे मुले शिकू शकत नाहीत, असे सांगत आहेत. त्यांनी मनोऱ्यांना विरोध केला नसता, तर आज ही वेळही आली नसती. त्यामुळे राज्याचा विकास करायचा असेल, तर त्यात लोकसहभाग महत्त्‍वाचा आहे. लोक आपल्या निर्णयांनीही सरकारला मदत करू शकतात. गोवा मुक्तीवेळी लोकसहभाग मोठ्या प्रमाणावर होता. आजही राज्य सर्वार्थाने पुढे न्यायचे असेल, तर त्यातही लोकसहभागाची गरज आहे.

शाळा सुरू करण्‍याबाबत
लवकरच निर्णय

कोरोना विषाणूचा प्रसार राज्यातच नव्हे, पूर्ण देशात झाला आहे. राज्यात ‘कोविड’ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे, हेही सत्य आहे. त्यामुळे राज्यातील शाळा कधीपासून सुरू केल्या जाव्या, याचा निर्णय घेतलेला नाही. काही विद्यालयांनी ज्यात अनुदानित व विना अनुदानितांचाही समावेश आहे, त्यांनी आपल्या पातळीवर ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. ऑनलाईन पद्धतीने सर्वांनाच शिक्षण घेणे शक्य होणार नाही. अशा विद्यार्थ्यांना वर्गातच शिक्षण द्यावे लागणार आहे. त्यांची व्यवस्था करण्याचा विचार शिक्षण खात्याच्या पातळीवर सुरू आहे. आम्हाला यंदा प्रामुख्याने दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांची चिंता आहे. त्यांच्या शिक्षणावर विशेष भर असेल. ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणाबाबत सरकार निर्णय घेणार आहे. थोड्याच दिवसांत त्याची माहिती दिली जाईल.


‘त्‍या’ विद्यार्थ्याला
मिळणार मोबाईल

विद्यार्थ्याला ऑनलाईन शिक्षण घेता यावे, यासाठी स्मार्टफोन विकत घेण्यासाठी काणकोणमधील एका मातेला दागिने विकण्याची वेळ आल्याचे वृत्त ‘गोमन्तक’ने काल (ता.१८)च्या अंकात दिले होते. त्या वृत्ताची दखल घेत कदंब वाहतूक महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी ‘त्या’ विद्यार्थ्याला मोबाईल देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ‘गोमन्तक’शी संपर्क साधून सोमवारी काणकोणमध्ये आपण तो मोबाईल पाठवून देतो, असे सांगितले आहे. ‘गोमन्तक’चे काणकोण प्रतिनिधी सुभाष महाले हे तो मोबाईल संबंधित कुटुंबियांकडे सुपूर्द करणार आहेत. श्री. घाटे यांनी कोविड महामारीच्या कठीण काळात आपल्या दातृत्वाचा प्रत्यय आणून दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com