करोना लस येईपर्यंत सवलत नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रतिनिधी
रविवार, 13 सप्टेंबर 2020

लस येईपर्यंत सवलत मिळणार नाही. सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे असून मास्क आवश्‍यक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन करत आरोग्य मंत्रालय दिशानिर्देशांच्या पालनाचे महत्त्व अधोरेखित केले.

नवी दिल्ली: लस येईपर्यंत सवलत मिळणार नाही. सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे असून मास्क आवश्‍यक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन करत आरोग्य मंत्रालय दिशानिर्देशांच्या पालनाचे महत्त्व अधोरेखित केले. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या मध्य प्रदेशातील पावणेदोन लाख घरकुलांचे उद्घाटन मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. 

कोरोनाविरुद्धच्या लढाईत मास्क व सामाजिक अंतरभान पाळण्याचे भान अनेक ठिकाणी सुटताना दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांनी देशवासीयांना पुन्हा या गोष्टींबाबत आग्रह केला. या गृह प्रवेश कार्यक्रमास मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित होते. 

निवडणूक लढवायची का?
या कार्यक्रमाचे मध्य प्रदेशातील २६ हजार ५४८ गावे-वस्त्या व १६ हजार ४४० ग्रामपंचायतींमध्ये थेट प्रसारण करण्यात आले. यावेळी काही लाभार्थींबरोबर पंतप्रधानांनी वेब संवादही साधला. ग्वाल्हेरच्या नरेंद्र नामदेव याने कलम ३७०, तोंडी तलाकचा उल्लेख करताच पंतप्रधानांनी त्याला ‘तुम्हाला निवडणूक लढवायची आहे का?’ असे हसत हसत विचारले.

 

संबंधित बातम्या