Madgaon Mayor : मडगाव नगराध्यक्ष घन:श्याम शिरोडकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव पास

मडगावचे नगराध्यक्ष घनःश्याम शिरोडकर यांच्या विरोधात आणलेला अविश्वास ठराव आज 15 विरुद्ध शून्य मतांनी संमत झाला.
Madgaon Mayor No Confidence Motion
Madgaon Mayor No Confidence Motion Dainik Gomantak

Madgaon Mayor : मडगावचे नगराध्यक्ष घनःश्याम शिरोडकर यांच्या विरोधात आणलेला अविश्वास ठराव आज 15 विरुद्ध शून्य मतांनी संमत झाला. हा ठराव मतदानास आला असता भाजपच्या 15 नगरसेवकांनी हात वर काढून या ठरावाला मंजुरी दिली. काल नगराध्यक्ष शिरोडकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आज त्यांच्यासह गोवा फॉरवर्ड नगरसेवकांनी या सभेवर बहिष्कार घातला.

मडगावचे नगराध्यक्ष घनःश्‍याम शिरोडकर यांनी अविश्‍वास ठराव मतदानापूर्वीच काल राजीनामा दिला. मात्र, दिगंबर कामत यांच्या मडगाव मॉडेलच्या दामोदर शिरोडकर यांच्या बरोबर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सदानंद नाईक आणि कामील बार्रेटो यांनीही नगराध्यक्षपदावर दावा सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी कायम असल्याचे दिसत आहे.

अविश्‍वास ठरावावर चर्चा करून नंतर मतदानासाठी शुक्रवारी सकाळी 11 वाजता बैठक बोलावली होती. यावेळी हात दाखवून उघडपणे मतदान होणार होते. त्यामुळे भाजपच्या कोणत्याच नगरसेवकाने घनःश्‍याम यांच्या बाजुने मतदान केले नसते. संख्याबळाचे गणित जुळत नसल्याने त्यांनी बैठकीच्या पूर्वसंध्येलाच राजीनामा नगरपालिका प्रशासन संचालकांकडे पाठवला. मागच्या निवडणुकीत भाजप नगरसेवकांनी क्रॉस मतदान केल्याने यापुढे हात दाखवून उघडपणे निर्णय घेण्यास निर्वाचन अधिकारी सांगतील, अशी व्युवरचना करण्यात आली आहे.

हे मतदान कसे असावे? याचा निर्णय निर्वाचन अधिकारी घेऊ शकतात, असा दावा कामत गट आणि भाजप करत आहे.

Madgaon Mayor No Confidence Motion
Madgaon Mayor Resigns : मडगावात घनःश्‍यामची माघार; तरीही भाजपची डोकेदुखी कायम

शुक्रवारी जर गुप्त पद्धतीने मतदान झाले असते, तर मला 20 मते पडली असती. गत निवडणुकीत पाच जणांनी माझ्या बाजूने मतदान केले, म्हणून त्यांना देवासमोर नारळावर प्रमाणित करण्यात आले. मला पुन्हा माझ्या साथी नगरसेवकांना धर्म संकटात टाकायचे नव्हते. त्यामुळेच मी राजीनामा दिला, अशी प्रतिक्रिया मावळते नगराध्यक्ष घनःश्‍याम शिरोडकर यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com