साखळी महापालिकेवरील भाजपची सत्ता संपुष्ठात; काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

dharmesh saglani Congress.jpg
dharmesh saglani Congress.jpg

साखळी: साखळीसह संपूर्ण गोमंतकीयांचे लक्ष लागून असलेल्या साखळी पालिकेचे नगराध्यक्ष यशवंत माडकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव आज अखेर 7 विरुद्ध 0 मतांनी संमत झाला. पालिकेच्या 13 सदस्यांपैकी नगराध्यक्ष यशवंत माडकर यांच्यासह 6 नगरसेवक बैठकीला गैरहजर राहिल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव 7-0 असा बहुमताने मंजुर झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे केवळ आठ महिन्यांतच यशवंत माडकर यांना नगराध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले आहे. साखळी पालिकेवरील गेल्या आठ महिन्यांपासून असलेली भाजपची सत्ताही संपुष्टात आली असून पालिकेवर पुन्हा एकदा काँग्रेस समर्थकांच्या सत्तेची वाट मोकळी झाली आहे. साखळी पालिका क्षेत्रातील असंख्य काँग्रेस कार्यकर्ते व धर्मेश सगलानी समर्थकांनी साखळी पालिका ठिकाणी उपस्थित राहून एकच जल्लोष केला.(The no-confidence motion against Sakhali Municipal Corporation Mayor Yashwant Madkar was finally passed by 7 against 0 votes today.)

साखळी (Sankhali) पालिका कार्यालयात अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत 13 सदस्यांच्या साखळी पालिका मंडळातील सत्ताधारी यशवंत माडकर (Yashwant Madkar) गटाचे यशवंत माडकर, आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, रश्मी देसाई, ब्रह्मानंद देसाई, शुभदा सावईकर हे सहा नगरसेवक गैरहजर राहिले, तर धर्मेश सगलानी (Dharmesh Saglani) गटाचे ज्योती प्रविण ब्लेगन, अन्सिरा रियाज खान, राया पार्सेकर, राजेश सावळ, कुंदा माडकर व पोटनिवडणूकीत निवडून आलेले राजेंद्र आमेसकर असे सात नगरसेवक बैठकीला उपस्थित राहून अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने हा ठराव 7-0 असा बहुमताने मंजूर झाला, असे जाहीर करण्यात आले. निवडणूक अधिकारी म्हणून साखळी पालिका मुख्याधिकारी दीपक वायंगणकर व उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांनी काम पाहिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com