गोवा : दहावी बारावी परिक्षाबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही; प्रमोद सावंत 

दैनिक गोमंतक
गुरुवार, 15 एप्रिल 2021

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने देशभरातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय बुधवारी घेतला.  केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोरखियाल निशंक यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली आहे. दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आला आहे. दहावीचे निकाल राज्य शिक्षण मंडळाने विकसित केलेल्या वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे तयार करण्यात येतील.

पणजी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने देशभरातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय बुधवारी घेतला.  केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोरखियाल निशंक यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली आहे. दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आला आहे. दहावीचे निकाल राज्य शिक्षण मंडळाने विकसित केलेल्या वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे तयार करण्यात येतील. तर बारावीच्या परीक्षा 1 जून पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असून 1 जून रोजी मंडळामार्फत कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन इयत्ता 12 वीच्या परीक्षांबाबत पुढील निर्णय घेऊ, असेही निशंक यांनी म्हटले आहे. मात्र  राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत दहावी आणि १२ वीच्या राज्य बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा कोणताही विचार केलेला नाही, असे सांगितले आहे. (No decision has been taken yet regarding 10th and 12th exams; Pramod Sawant) 

गोमंतकीयांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारकडून विकासकामांना निधी 

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या अंतिम परीक्षा 24 एप्रिलपासून नियोजित आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता  गोवा शिक्षण विभागाने यापूर्वीच इतर वर्गांच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र अद्याप आम्ही दहावी बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्याचबरोबर परीक्षेदरम्यान,  कोरोना प्रतिबंधक सर्व उपाययोजना लागू करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपायांचे पालन करून महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी राज्यात महाविद्यालयीन परीक्षा यशस्वीरित्या घेण्यात आल्याचेही यावेळी प्रमोद सावंत यांनी सांगितले. 

रेतीसाठी सीआरझेड आराखड्यात दुरुस्‍ती

तसेच, गेल्या वर्षी या परिक्षामध्ये योग्य सामाजिक अंतर राखण्यासाठी  केवळ 11 विद्यार्थ्यांना एका परीक्षा हॉलमध्ये बसण्याची परवानगी होती. तथापि, सीबीएसईने बुधवारी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आणि १२ वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या.  मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रातही कोरोनव्हायरस प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ झाल्यामुळे या वर्गांसाठी राज्य मंडळाच्या परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.  पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांनी सांगितले की ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि बोर्डाच्या परीक्षा घ्यायच्या की रद्द करायच्या याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर कर्नाटक सरकारनेही ठरल्याप्रमाणे परीक्षा होणार असल्याचे म्हटले आहे.

संबंधित बातम्या