गोव्यातील प्रसिद्ध म्हार्दोळ मंदिरात प्रवेश बंदी

गोव्यातील प्रसिद्ध म्हार्दोळ मंदिरात प्रवेश बंदी
No entry to the famous Mardol temple in Goa

फोंडा: फोंडा येथील म्हार्दोळ श्रीम्हाळसाच्या प्रसिद्ध मंदिरात सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. मंदिर समितीच्या माहितीनुसार मंदिराच्या परिसरात प्रवेश नाकारला आहे. कोणताही समारंभ सभागृहात होणार नाही.  त्याचबरोबर मंदिर परीसरातील खोल्यांमध्ये वास्तव्य करता येणार नाही.

“कोरोना रोगोचा वाढता प्रसार बघता आणि सद्यस्थिती लक्षात घेता, राज्य प्रशासनाने जारी केलेल्या एसओपीचे अनुसरण करण्यासाठी आम्ही मंदिरात प्रवेश नाकारला आहे, आणि काही काळासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे," असे मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीवल्लभ रायतूरकर यांनी सांगितले.

गोव्यातील म्हार्दोळ मंदिर पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे. देशी आणि परदेशी पर्यटक या मंदिराला आवडीने भेट देतात. त्याशिवाय शेजारच्या राज्यात किंवा देशात स्थायिक झालेले महाजनसुद्धा मंदिराला भेट देतात आणि अधूनमधून मंदिर परीसरातील खोल्यांमध्ये वास्तव्य करतात.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com