मेळावलीत ‘आयआयटीला नो एन्ट्री

प्रेमानंद नाईक
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

येथील ‘आयआयटी’ विषयी आज रविवार सकाळी मेळावली पंचक्रोशी ग्राम बचाव आंदोलन समितीतर्फे मुरमुणे येथे ‘आयआयटीला प्रवेश नाही’, ‘नो एंट्री फॉर आयआयटी इन मेळावली’ अशा आशयाचा फलक लावण्‍यात आले. मेळावली येथील लोकांनी आंदोलन अधिक आक्रमक केले आहे. बुधवारी अनोख्‍या पद्धतीने रक्षाबंधन कार्यक्रम करून लक्ष वेधले.

गुळेली

या ठिकाणी ज्या झाडावर क्रमांक घातले आहेत, त्या झाडांना राख्या बांधल्या होत्या. आज सुमारे ५००च्या आसपास लोकांनी एकत्र येऊन सर्वप्रथम सातेरी जल्मी देवस्थान येथे पारंपरिक गाऱ्हाणे घालून समितीतर्फे जे काम हाती घेतले आहे त्याला यश दे, असे मागणे केले.
शेळ-मेळावली येथील सडयो गावकर यांनीही गाऱ्हाणे घातले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत सर्व प्रथम मेळावली पंचक्रोशी ग्राम बचाव आंदोलनाचे राम मेळेकर यांनी स्वागत केले आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याबद्दल आभार व्यक्त केले.
राम मेळेकर म्हणाले, आता आमचे आंदोलन अशा टप्प्यावर येऊन पोहोचले आहे, की यातून माघार नाहीच. हे आंदोलन चिरडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत, ते चालूच राहणार आहेत. मात्र आम्ही सर्व मेळावली वासियांनी एकसंघ राहून हे आंदोलन पुढे न्यायचे आहे. यापुढे वेगवेगळ्या प्रकारे आमचा छळ होऊ शकतो. प्रसंगी अटकही होऊ शकते, या सर्वांची आम्ही तयारी ठेवली पाहिजे. हे आंदोलन असेच आम्ही चालू ठेवायला पाहिजे, त्यासाठी तुम्हा सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.
यानंतर प्रत्येक गावातील गावकऱ्यांनी आपल्या गावात झालेल्या बैठकीचे इतिवृत्त उपस्थित जनसमुदाय पुढे कथित केले शनिवार दिनांक १८ रोजी सर्व
मेळावली परिसरातील सर्व गावागावांत बैठक घेण्यात आली. सर्वप्रथम पैकुळ गावातील बैठकीचा अहवाल निलेश मेळेकर यांनी सादर केला आणि गावातील अधिकाधिक लोक आमच्या सोबत असल्याचे सांगितले, पैकुळ गावातील जे कोण आयआयटीचे समर्थन करतात, त्यातील काही जणांनी आम्ही तुमच्या बरोबर आहोत, असे आश्वासन दिल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.
धडा मेळावली या गावचे रुपेश गावकर यांनी वृत्तांत दिला. ते म्हणाले, सर्व लोकांनी आम्ही या आंदोलकाबरोबर आहोत. मुरमुणे येथील दिलीप गावकर म्हणाले, काहीजणांनी आयआयटी समर्थन केलेले आहे, त्यांचे मतपरिवर्तन होईल. सरयू मळेकर यांनी शेर मिळवली गावातील वृत्तांत दिला तर वसंत निळेकर यांनी निळेकर यांनी गावातील वृत्तांत दिला.
दशरथ मांद्रेकर म्हणाले, आपल्याला आज खरोखरच आनंद होत आहे एवढ्या मोठ्या संख्येने सत्तरीच्या इतिहासात प्रथमच लोक एकत्र जमले आहेत आणि अशीही ही आंदोलने दडपण्यासाठी दडपशाहीचा अवलंब होत आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो.
गोकुळदास मेळेकर यांनी सांगितले, की जे कोणी आमच्या विरोधात आहेत. तेही लवकरात लवकर आमच्या बरोबर आमच्या सोबत राहून या आंदोलनात सहभागी व्हावे, कारण तेही आपलेच भाऊबंद आहेत.
शेळ मेळावली येथील सुकडो उसपकर, धडा मेळावली सत्तरी येथील उमेश कासकर मैंगीणे येथील उत्तम मेळेकर यांनी आपण गावातील लोकांबरोबर आहोत, हे सर्वांसमोर जाहीर केले. यापूर्वी आयआयटी समर्थन झालेल्या बैठकीत ते हजर राहिले होते. परंतु आता संपूर्ण गाव आयआयटीला विरोध करतोय त्यामुळे आपणही आयआयटी विरोधाच्या बाजूने आहे. गावाबरोबरच थांबून गाव जो काही निर्णय घेईल, त्यात सहभागी होऊ, असे सांगितले.
आजच्या बैठकीला पाचशेच्या आसपास ग्रामस्था उपस्थित होते. शंकर नाईक व निकिता नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मेलावली पंचक्रोशी ग्राम बचाव आंदोलनाचे समन्वयक शशिकांत सावर्डेकर यांनी आभार मानले.

येथील ‘आयआयटी’ विषयी आज रविवार सकाळी मेळावली पंचक्रोशी ग्राम बचाव आंदोलन समितीतर्फे मुरमुणे येथे ‘आयआयटीला प्रवेश नाही’, ‘नो एंट्री फॉर आयआयटी इन मेळावली’ अशा आशयाचा फलक लावण्‍यात आले. मेळावली येथील लोकांनी आंदोलन अधिक आक्रमक केले आहे. बुधवारी अनोख्‍या पद्धतीने रक्षाबंधन कार्यक्रम करून लक्ष वेधले.

संपादन - संजय घुग्रेटकर

goa goa

संबंधित बातम्या