कुर्डीत प्रवेशबंदी

Dainik Gomantak
सोमवार, 18 मे 2020

सर्वत्र प्लास्टिक आणी फोडलेल्या काचेच्या बाटल्यांचा खच पहायला मिळत आहे. दिवसा रात्री ओल्या पार्ट्या केल्या जात असतात.

सांगे

कुर्डी गावात जाण्यासाठी तरुणाई अधिक उत्सुक झाल्याचे दिसून येऊ लागलें आहे. स्थानिक लोकां पेक्षा गोवाभरातील उत्साही लोक केवळ मजा मारण्यासाठी कुर्डी गावात धाव घेत असून या मौज मारणाऱ्यांना ना कोरोनाची भीती ना कडक उन्हाची पर्वा. सामाजिक अंतर, टाळेबंदी जुगारून केपे, मडगांव, फोंडा, पणजी, म्हापसा, डिचोली, पेडणे पासून काणकोण पर्यंत चे हौशी लोक कुर्डी गाव पाहण्यासाठी गर्दी करीत असल्याचे सांगेचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांना ही खबर मिळताच त्यांनी सुट्टीचा दिवस असलेल्या रविवारी पोलीस फाटा घेऊन कुर्डीला धाव घेतली. संचार बंदी मोडून कुर्डीला गर्दी करणाऱ्यांना दोनशेच्या  आसपास वाहन चालकांना पोलिसांनी चलन दिले. व संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन टाळेबंदी काळात कुर्डीत प्रवेश बंद करण्यासंदर्भात आदेश दिला. 

सुट्टीच्या दिवसात पर्यटक म्हणून कुर्डीत जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. आता कोरोनाची लागण झालेली असताना व टाळेबंदी काळात तोंडाला मास्क न बांधता "सर्व बंद तोडून जेव्हा नदी धुंद वाहते "अशीच परिस्थिती कुर्डीत जाणाऱ्या तरुणाईची झालेली असते. गोव्याच्या या टोका पासून त्या टोका पर्यंतचे पर्यटक सर्व सीमा ओलांडून कुर्डीत पर्यटनाच्या नावाखाली धिंगाणा अधिक घातला जातो. सर्वत्र प्लास्टिक आणी फोडलेल्या काचेच्या बाटल्यांचा खच पहायला मिळत आहे. दिवसा रात्री ओल्या पार्ट्या केल्या जात असतात. अश्या झिंग वातावरणात परिस्थिती माहिती नसलेला एकदा तरुण आपल्या प्रेमिकेला घेऊन गेला असताना काही विपरीत घडल्यास घडणाऱ्या घटनेला कोण जबाबदार असणार. पालकांनी आपली मुले कुठे जातात यावर लक्ष देणे गरजेचे आहे. 

  उपजिल्हाधिकाऱ्यांची कुर्डी भेट 

कुर्डी गाव पाहण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी होत असल्याचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांच्या कानी पडताच त्यांनी सांगे पोलीसाना बरोबर घेऊन कुर्डी गाठली असता कुर्डीला जत्रेचे स्वरूप आल्याचे दिसून आले. कुर्डी आसपासचे लोक आल्यास एकवेळ समजू शकतो पण गोवा भरातून दुचाकी चारचाकी घेऊन मोठया प्रमाणात लोक आल्याचे आढळून आले. लहान सहान मुलांना घेऊन फिरायला येणे हा जीवावरचा खेळ आहे. या पर्यटकांना विचारल्यास काहीजण उडवाउडवीची उत्तरे देऊ लागलें तर काहीजण मंत्री, मुख्यमंत्री यांना कॉल करूं लागलें. अश्या सर्वाना सांगे पोलिसांनी चलन देण्यास सुरुवात केली.घरातून न सांगता कुर्डीला गेलेली जोडपी पोलिसांच्या पाया पडत होती. इतक्या मोठया संख्येने जमा झालेले लोक पाहून उपजिल्हाधिकाऱ्यानी तातडीची बैठक बोलवून कुर्डी गावात जाण्यासाठी प्रवेश बंदचा आदेश दिला आहे. 

    कोळंब रिवण येथून जाणाऱ्यांना केपे पोलीस, वनरक्षक फाटक बसवून प्रवेश  बंद करण्याची सूचना केली आहे तर कुर्पे येथून जाणाऱ्यांना सांगे पोलीस अडविणार आहे. इतके करूनही चोरवाटेने कुर्डीत गेल्याचे आढळल्यास पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. जलसंपदा खात्याला सर्व बाजूने कुर्डीत प्रवेश बंदचे फलक लावण्याची सूचना केली आहे. तरुण मंडळी फेसबुक, वॉट्सअप माध्यमातून कुर्डी गावात मजा मारतानाची छायाचित्रे प्रसिद्ध करून संचार बंदी मोडण्यास कारणीभूत ठरत असल्याचे दिसून आले आहे.  

      आता कुर्डी गावात जाण्यासाठी सर्व बाजूने नाकाबंदी केली जाणार असल्याने कोरोनाच्या काळात मोठी गर्दी करण्या पासून लांब राहणे हिताचे असल्याचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी आवाहन केले आहे.   (कुर्डी गावात संचार बंदी मोडणाऱ्यावर कारवाई करताना सांगे पोलीस. 2)उपजिल्हाधिकारी अजय गावडे )

 

 

 

 

संबंधित बातम्या