तर त्यांनी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना पत्र लिहावे

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

सत्तरी तालुक्यामध्ये आय आय टी प्रकल्प नको असे पत्र आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल मुख्यमंत्र्यांना लिहिले होते, त्याचा संदर्भ घेऊन सरदेसाई म्हणाले, 

पणजी: गोव्यातील कोळसा वाहतूक आणि लोहमार्गाचे दुपदरीकरणाला मंत्री मायकल लोबो आणि फिलीप नेरी रॉड्रिग्स हे खरोखरच विरोध करत असतील तर त्यांनी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना पत्र लिहावे असा सल्ला गोवा फॉरवर्ड चे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी आज दिला.

सत्तरी तालुक्यामध्ये आय आय टी प्रकल्प नको असे पत्र आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल मुख्यमंत्र्यांना लिहिले होते, त्याचा संदर्भ घेऊन सरदेसाई म्हणाले, राणे यांनी केवळ पत्र लिहून थांबता कामा नये, त्यांची मागणी मान्य झाली नाही तर मंत्रिमंडळ सोडण्याची सुद्धा त्यांनी तयारी ठेवली पाहिजे, तरच ते पुढे जाऊ शकतील. ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो आणि जलसंपदा मंत्री फलीप नेरी रॉड्रिग्स यांनी ही कोळसा वाहतुकीस आपला विरोध आहे असे नमूद केलेले आहे. त्यांनी केवळ बोलून थांबता कामा नये, त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावे आणि त्याचा पाठपुरावा करावा. लोहमार्गाच्या दुपदरीकरणासही  विरोध करावा कारण तेही कोळसा वाहतुकीसाठी आहे. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर त्यांनीही सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी ठेवावी तरच जनतेचा त्यांच्यावर विश्वास असेल.

संबंधित बातम्या