गोव्यात ना लॉकडाऊन ना संचारबंदी: मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत 

दैनिक गोमंतक
बुधवार, 7 एप्रिल 2021

लॉकडाऊन किंवा संचारबंदी हा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याचा उपाय नव्हे.

पणजीः  गोव्यामध्ये  कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी  लॉकडाऊन (टाळेबंदी) आणि रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा कोणताही विचार सरकार करणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले, लॉकडाऊन किंवा संचारबंदी हा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याचा उपाय नव्हे.

डिचोली: शिरगाव पंचायतींच्या सरपंचपदाची माळ अच्युत गावकराच्या गळ्यात

ते म्हणाले गेल्या वर्षी कोरोना प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केला. यामुळे पर्यटनावर विसंबून असलेल्या राज्याची अर्थव्यवस्था पूर्णता ठप्प झाली होती. आता पुन्हा तो अनुभव घ्यायचा नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरणे, शाररिक अंतर पाळणे, गर्दी टाळणे आदी नियमांची सक्तीने अंमलबजावणी राज्यात केली जात आहे. देशभरातच कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे गोवा त्याला अपवाद असू शकत नाही.

गोवा: राज्यात 8 एप्रिल नंतर तुरळक पावसाची शक्यता

राज्याच्या सीमांवरही इतर राज्यातून येणाऱ्यांवर गोवा सरकार कोणतेही निर्बंध घालणार नाही. राज्य सरकारने लसीकरणावर भर दिलेला आहे. येणाऱ्या पर्यटकांनाही गोव्यात लसीकरण करून घ्यावे. सरकारी इस्पितळात ते मोफत , तर खासगी इस्पितळात 250 रुपये शुल्क भरून ती सुविधा उपलब्ध आहे. गोव्यात आतापर्यंत 59,315 कोरोना रुग्ण आढळले असून त्यापैकी 56,298 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे, तर 837 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे
 

संबंधित बातम्या