नोकऱ्यांसाठी कुणीही पैसे घेत नाही घेतल्यास तक्रार करावी; CM सावंत

आपल्या सरकार मधील कोणीही मंत्री वा आमदार नोकरी देण्यासाठी पैसा पैसे घेत नाही. काँग्रेसने पुराव्याअभावी आरोप करणे सोडून द्यावे. जर कुणाकडून पैसे कोणी मागितले असल्यास त्याबाबत पुरावा सादर करावा;असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी आज केले.
नोकऱ्यांसाठी कुणीही पैसे घेत नाही घेतल्यास तक्रार करावी; CM सावंत
CM Pramod SawantDainik Gomantak

पणजी: आपल्या सरकार मधील कोणीही मंत्री वा आमदार नोकरी (Job) देण्यासाठी पैसा पैसे घेत नाही. काँग्रेसने (Congrss) पुराव्याअभावी आरोप करणे सोडून द्यावे. जर कुणाकडून पैसे कोणी मागितले असल्यास त्याबाबत पुरावा सादर करावा. किंवा पोलिसात थेट तक्रार दाखल करावी. पैसे घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी आज केले.

CM Pramod Sawant
गोव्यातील प्रत्येकाला विविध सवलतींचा लाभ देणार; डॉ.सावंत

रायबंदर येथे आज एका कार्यक्रमानंतर विद्यमान गोवा सरकारमधील काही मंत्री नोकरीसाठी पैसे घेत असल्याचा कॉंग्रेसने काल जो आरोप केला होता; त्याबद्दल पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. आरोप करण्यासाठी आरोप करणे हे सध्या नित्याचे झाले आहे. जर काँग्रेसकडे कुणी तक्रार केली असेल किंवा पुरावा सादर केलेला असेल तर त्यांनी तो पोलिसांना द्यावा किंवा थेट माझ्याकडे द्यावा. आपण नक्कीच पैसे घेणाऱ्यावर कारवाई करीन. मात्र आरोप करायचे म्हणून आरोप करू नयेत. पुराव्याअभावी आरोप करणे ही काँग्रेसची सवयच आहे. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

Related Stories

No stories found.