Goa Panchayat Election : पंचायतीत संगीत खुर्ची नको !

कुर्टी-खांडेपारची अपेक्षा : पाच वर्षांत पाहिले आठ सरपंच
संगीत खुर्ची
संगीत खुर्चीDainik Gomantak

फोंडा: फोंडा मतदारसंघातील कुर्टी खांडेपार या एकमेव अग्रगण्य पंचायतीत ‘तुल्यबळ लढतीचे रणशिंग फुंकल्यासारखे दिसू लागले आहे. या पंचायतीच्या सीमारेषा फोंडा पालिका हद्दीशी जवळ असल्यामुळे या पंचायतीला महत्त्व आहे. गेल्या खेपेला ही पंचायत गाजली ती त्यात झालेल्या ‘संगीत खुर्ची’मुळे. अकरा प्रभाग असलेल्या या पंचायतीत गेल्या पाच वर्षात तब्बल आठजणांनी सरपंचपद भूषविले होते. त्यामुळे लोकांतही नाराजीचा सूर असल्याचे दिसून येते.

संगीत खुर्चीमुळे पसरलेल्या नाराजीचा मतदानावर परिणाम होतो का हे बघावे लागेल. पण असे असूनही अनेक माजी पंच व सरपंच रिंगणात असून प्रत्येकजण आपले नशीब आजमावताना दिसत आहेत. गतवेळी पराभूत झालेले पंचही पुन्हा रिंगणात आहेत. त्यामुळे तुल्यबळ लढतीची शक्यता दिसू लागली आहे.

संगीत खुर्ची
AAP Allegation: रस्ते दुरुस्ती कामात तब्बल 15 कोटी रुपयांचा घोटाळा!

रवी नाईक यांच्या पाठिंब्याची लॉटरी कुणाला ?

फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी वरवर आपले पॅनल जाहीर केले नसले तरी आतून ते आपल्या काही समर्थकांना पाठिंबा देऊ शकतात. मात्र सध्या रवींचा पाठिंबा मिळवण्याकरिता उमेदवारांत चुरस लागली असून ‘जो जिता वही सिंकदर’ चा प्रत्यय येत आहे. विधानसभेवेळी रवींच्या विरोधात काम केलेले पंचही आता रवीच्या आसऱ्याला येण्याची तयारीत दिसत आहेत.

मगोप ‘रायझिंग पॅनल’द्वारे रिंगणात : ‘मगोप’ने रिंगणात उडी घेतली असून त्यांनी आपल्या ‘रायझिंग पॅनल’द्वारा अकराही उमेदवारांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता या लढतीला तिरंगी स्वरुप येण्याची शक्यता दिसत आहे. कॉंग्रेसचे गतवेळचे उमेदवार राजेश वेरेकर यांनी पाच सहा उमेदवारांना पाठिंबा दिला असला तरी ते कॉंग्रेसचे की वेरेकरांचे उमेदवार आहेत, हे स्पष्ट झालेले नाही.

संगीत खुर्ची
सांगेत पोलिस बंदोबस्तात आयआयटी सर्वेक्षण

प्रचाराला गती

प्रशासक नेमण्यापूर्वी सरपंच असलेले रवींचे कट्टर समर्थक दादी नाईक मात्र यावेळी रिंगणात उतरलेले नाहीत. एकूण 49 उमेदवार रिंगणात असून सर्व उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे आता निवडणूक चिन्हे मिळाल्यामुळे आवाहनपत्रांसह ते मतदारांकडे जाताना दिसताहेत. आता मतदार त्यांना किती प्रतिसाद देतात हे 12 ऑगस्टलाच कळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com