नो नेटवर्क नो राशनकोठा

मनोदय फडते
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

नेत्रावळीत सध्या विचित्र परिस्थिती निर्माण झाली असून, सरकारच्या स्वस्त धान्य दुकानात रेशनकोठा उचल करण्यासाठी गेल्यास वीज नसल्यास नेटवर्क नाही, अन्‌ नेटवर्क नसल्यास रेशन नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नेटवर्क नसल्यास सरकारी नियमानुसार स्वस्त धान्य चालक रेशन देऊ शकत नसल्याने ग्राहकांना तीन-तीन दिवस वाया घालवावे लागत आहेत.

सांगे

नेत्रावळीत सध्या विचित्र परिस्थिती निर्माण झाली असून, सरकारच्या स्वस्त धान्य दुकानात रेशनकोठा उचल करण्यासाठी गेल्यास वीज नसल्यास नेटवर्क नाही, अन्‌ नेटवर्क नसल्यास रेशन नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नेटवर्क नसल्यास सरकारी नियमानुसार स्वस्त धान्य चालक रेशन देऊ शकत नसल्याने ग्राहकांना तीन-तीन दिवस वाया घालवावे लागत आहेत. सद्यःस्थितीत नेत्रावळीतील नागरिकांना अन्न-धान्याची चिंता सतावत असल्याने यावर सरकारनेच त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. समाजकार्यकर्ते अमित नाईक यांनीही सोशल मीडियातून सरकारचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला आहे. 
नेत्रावळी ग्रामपंचायत क्षेत्रात एकमेव स्वस्त धान्य दुकान. या अंतर्गत तुडव, वेर्ले साळजीणी हा अठरा कि. मी. अंतराचा भाग. नुने हा नऊ की. मी. चा भाग शिवाय विचुन्द्रे, ज्याके आणि नेत्रावळी ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व भागासाठी एकमेव स्वस्त धान्य दुकान. नागरी पुरवठा खात्याने सर्व रेशन कोठा उचल करण्यासाठी शिधापत्रिका धारकाने ऑनलाईन पद्धतीने आपला अंगठा दाबल्याशिवाय रेशन देऊ नये हा फतवा काढला आहे. पण, हा फतवा शहरात उपयोगी पडू शकतो. त्याचा खरा फटका ग्रामीण भागाला बसू लागला आहे. वीज नसल्यास नेटवर्क नाही अन्‌ नेटवर्क नसल्यास अंगुठा उपयोगी नसल्याने अठरा कि.मी. वरून आलेल्या ग्राहकांना तीन तीन दिवस खेपा माराव्या लागत आहेत. वीज येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. तासन्‌तास ग्राहक नेटवर्कची प्रतीक्षा करीत असतात. 

जनतेची फरफट थांबवा... 
आजच्या परिस्थितीत सहज वाहनसेवा उपलब्ध नसल्याने महिलावर्ग चार-पाचजणी एकत्र होऊन भाड्याची रिक्षा करून रेशनसाठी येतात. पण, नेत्रावळीत आल्यानंतर नेटवर्क नसल्याने दिवस वाया जात असतो. सतत तीन दिवस येऊनसुद्धा वाया जात आहे. चांगली सेवा नसताना हा प्रकार सरकारने नेत्रावळीतील जनतेच्या माथी मारलेला आहे. आता चतुर्थीजवळ आल्याने रेशन उचल करण्यासाठी गर्दी होणारच आहे. त्यात नेटवर्क नसल्यास स्वस्त धान्य दुकानदारांनी संतापत ग्राहकांना कशे तोंड द्यावे, हा प्रश्न निर्माण झाल्याने सरकारने ब्रॉडबॅण्ड सेवा उपलब्ध करून द्यावी किंवा कोरोना काळात पूर्वी सारखीच पद्धत अवलंबून रेशन उचल करण्यासाठी जनतेची नेटवर्क विना होणारी फरफट थांबवावी, अशी मागणी समाजकार्यकर्ते अमित नाईक यांनी सरकारकडे केली आहे. 

संपादन ः संदीप कांबळे

Goa Goa Goa 

संबंधित बातम्या