गोव्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

ज्यात कोरोनामुळे आज एकही व्यक्ती दगावली नाही. त्याचबरोबर नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली.

पणजी:  राज्यात कोरोनामुळे आज एकही व्यक्ती दगावली नाही. त्याचबरोबर नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली. त्यामुळे आरोग्य खात्याला व राज्याला हा एकप्रकारे दिलासाच मिळाला आहे. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज  दिवसभरात 53 नवीन कोरोना रुग्ण सापडले, तर 102 कोरोना रुग्ण बरे झाले. आतापर्यंत  गोव्यात कोरोनामुळे  मृत्यू होणाऱ्यांची संख्या 761 झालेली असून  राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 97 टक्के असून आजच्या दिवशी कोरोना झाल्याने उपचार घेणाऱ्यांची संख्या 824 झाली आहे.

मोप विमानतळासाठीचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग करू नये -

संबंधित बातम्या