केरीवासीयांच्या नशिबी पायपीटच

No road, electricity facility in Querim
No road, electricity facility in Querim

General काणकोण: खोतीगाव पंचायत क्षेत्रातील डोंगर माथ्यावर वसलेल्या  केरीवासीयाच्या नशिबी पायपीटच आली आहे. या वाड्यावरील अनेक पिढ्या खस्ता खाऊन काळाच्या पडद्याआड गेल्या. मात्र, त्यांच्या नशिबी अद्याप वीज, रस्ता नाही.

खोतीगाव अभयारण्य कक्षेत हा भाग येत आहे. या खोतीगाव अभयारण्य व्याप्त वाड्यावर जन्माला येऊन आम्ही कोणते पाप केले आहे असा प्रश्न एकविसाव्या शतकातील पिढी करू लागली आहे. या वाड्यावर जाण्यासाठी खोतीगावातील कुस्के व सांगे तालुक्यातील साळजिणी गावातून पायवाटा आहे‌. त्यातील कुस्के गावातून जाणारी पायवाट तीव्र चढण व आडवळणाची आहे. मात्र, त्यामानाने साळजिणी गावातून केरी वाड्याकडे येणारी वाट सरळ कमी उताराची आहे.

साळजिणीपर्यंत रस्ता आहे, त्यानंतर येथील रहिशांना सुमारे चार किलोमीटरचे अंतर पायपीट करून केरीवाडा गाठावा लागतो. येथील रहिवाशांना बांधकाम साहित्य व अन्य सामान डोक्यावर घेऊन सुमारे एक तास पायपीट करावी लागते. बांधकाम साहित्य वाड्यावर नेण्यासाठी साळजिणीपर्यंत वाहनाने सामान आणले जाते. त्यानंतर डोक्यावर घेऊन ते चार किलोमीटर अंतर पायपीट करून केरी वाड्यावर नेले जाते.

आमच्या वाडवडिलांनी चिरे असे आणणे कठीण असल्याने मातीच्याच भिंतीची घरे बांधली. माडाच्या झावळ्या, गवताने छप्पर शाकरले. आता किमान कौलारू घरे या वाड्यावर दिसत आहेत. मात्र, ती अशाच प्रकारे साळजिणीहून पायपीट करून आणलेल्या बांधकाम साहित्यामुळे. आजही हीच परिस्थिती आमच्या नशिबात आहे अशा शब्दांत येथील युवक गणेश वेळीप व कमलाकर वेळीप यांनी व्यथा मांडताना सांगितले.

साळजिणीपासून सहजपणे या वाड्यावर येण्यासाठी रस्ता काढणे शक्य आहे. मात्र, आम्ही सर्व राजकीय नेत्यांच्या दुर्गम भागातील रहिवशांना किमान मूलभूत गरजा पुरविण्याच्या त्याच्या भूमिकेकडे डोळे लावून बसल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com