गोव्याच्या सीमाभागात उडाला गोंधळ

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

बाहेर राज्यातून गोव्यात येणाऱ्या कोणत्याच प्रकारची टेस्ट नाक्यावर केली जात नव्हती.  मात्र महाराष्ट्र येथे जाणाऱ्यांची टेस्ट केली जात होती. 

मोरजी:  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची थर्मल तपासणी करण्याचा आदेश प्रत्येक तपासणी नाक्यावर दिल्यामुळे २५ रोजीपासून किरणपाणी आरोंदा, न्हयबाग सातार्डा व बांदा पत्रादेवी चेक नाक्यावर महाराष्ट्र सरकार  तपासणी करत आहे . त्यामुळे नाक्यावर नागरिकांच्या रांगा व गर्दी दिसून येते .

कोरोना महामारीने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडून टाकले. अजूनही आरोग्य खात्याला यावर लस मिळवता आली नाही त्यामुळे नागरिक अजूनही कोरोनाच्या भयाने जीवन जगावे लागते. कोरोनाने कुणालाच सोडलेले नाही . २२ मार्च २०२० केंद्र सरकारने लॉक डाऊन जाहीर केले . त्या काळापासून ते आता पर्यंत सर्व व्यावसायिक नागरिक यांच्या आर्थिक स्थितीचे कंबरडे मोडले . ते पूर्व पदावर येत असतानाच दुसऱ्या बाजूने महाराष्ट्र राज्यात कोरोना संसर्ग वाढत आहे . त्यासाठी तिथल्या सरकारने आपल्या राज्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची थर्मल तपासणी आणि कोरोना नकारात्मक प्रमाणपत्र असणाऱ्याना प्रवेश दिला जाईल असा आदेश आहे . मात्र आज केवळ महाराष्ट्र येथे जाणाऱ्यांची थर्मल तपासणी केली जात  होती. त्यांच्याकडे कोरोना नकारात्मक प्रमाणपत्रे मागितली जात नव्हती. मात्र गोवा राज्यात येणाऱ्याची तपासणी नाक्यावर होत नाही .

सीमाभागात गोंधळ
दैनदिन कामासाठी. सामान आणण्यासाठी पेडणे तालुक्यातील नागरिक दररोज बांदा , सातार्डा , सावंतवाडी , दोडामार्ग , कवठनी आरोदा वेंगुर्ला या भागात जावे लागायचे त्याना आज किरणपाणी  आरोदा बांदा या नाक्यावर थर्मल टेस्ट करावी लागली . महाराष्ट्र येथे जाणाऱ्या वाहनचालकांचे गाडीचे नंबर नोंद करून व चालकांची थर्मल टेस्ट केल्यानंतर त्याना जावू दिले . जे नागरीक दिवसाला कितीतरी वेळा बांदा , आरोंदा या ठिकाणी जात होते त्यांची दिवसातून एकदाच टेस्ट केली जात होते.

राज्यात येणाऱ्यांची कोणतीच टेस्ट नाही .
बाहेर राज्यातून गोव्यात येणाऱ्या कोणत्याच प्रकारची टेस्ट नाक्यावर केली जात नव्हती.  मात्र महाराष्ट्र येथे जाणाऱ्यांची टेस्ट केली जात होती. त्यामुळे नाक्यावर गर्दी दिसत होती शिवाय नाक्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पर्यटकावर विपरीत परिणाम
पेडणे तालुक्यात पर्यायाने राज्यातील किनारी भागात मोठ्या प्रमाणात देशी पर्यटक आले होते . त्यामुळे किनारे फुलून दिसत होते . मात्र अचानक महाराष्ट्र सरकारने फतवा काढल्यामुळे अनेक जण माघारी फिरले . काही पर्यटक नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आले होते मात्र सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे ते आपपल्या गावी फिरले आहेत , या निर्णयामुळे परत एकदा ऐन पर्यटन हंगाम सुरु होणाऱ्या पर्यटनावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.

आणखी वाचा:

 

 

संबंधित बातम्या