कर्नाटकातील शेतकऱ्यांनी बंद पुकारल्याने गोव्यात दोन दिवस भाजी पुरवठा ब़ंद

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

कर्नाटकातील शेतकऱ्यांनी बंद पुकारल्याने गोव्याला दोन दिवस भाजी पुरवठा ब़ंद राहणार आहे.

पणजी: कर्नाटकातील शेतकऱ्यांनी बंद पुकारल्याने गोव्याला दोन दिवस भाजी पुरवठा ब़ंद राहणार आहे. कृषी पणन समितीच्या माध्यमातून व्यवहार करा या मागणीसाठी कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी आज बंद पुकारला आहे.

गोव्यातील जनतेला भाजीपाला पुरवण्यासाठी गोवा सरकारचे गोवा फलोत्पादन विकास महामंडळ बेळगाव येथे भाजी खरेदी करून गोव्यात आणते. गोव्यातील खुल्या बाजारातही बेळगावातील भाजीपाला येतो. आज त्या परिसरातून गोव्याला येण्यासाठी गाड्या निघणार नसल्याने तसेच मंगळवारी बाजाराला साप्ताहिक सुट्टी असल्याने गोव्यात दोन दिवस भाजीपाला पुरवठा बंद राहणार आहे.

आणखी वाचा:

गोव्यातील कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर.. महिना संपायच्या आधीच मिळणार पगार -

संबंधित बातम्या