वास्कोतील मच्छिमाऱ्यांचा सवाल गुलदस्त्यात

No work done under sagarmala project which was supposed to help fishermen in vasco
No work done under sagarmala project which was supposed to help fishermen in vasco

मुरगाव: वास्कोतील मच्छिमाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेतून १३० कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक आणि सर्व सोयीसुविधा असलेली मच्छिमारी जेटी बांधण्यासाठी २०१७ साली वास्कोत पायाभरणी केली पण, आजपावेतो या प्रकल्पासाठी साधी एक वीटही बसविण्यात आलेली नाही.


तत्कालीन केंद्रीय जहाजोद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठ्या समारंभपूर्वक जेटी प्रकल्पाची पायाभरणी केली होती.मुरगाव बंदराच्या धक्क्यांचे विस्तारीकरण खारवीवाड्यावरील हिंदू स्मशानभूमी पर्यंत करण्यात येणार होते त्यात मच्छिमारी जेटी विकसीत करण्याची योजना एमपीटीची होती.


सद्यस्थितीत असलेली जेटी अनेक समस्यांने ग्रासलेली आहे.हे जाणूनच नवीन जेटी उभारण्यासाठी पावले गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी उचलण्यात आली होती पण,निवडणूका होऊन चार वर्षे उलटत आली तरी मच्छिमारी जेटी प्रकल्पाचा विषय लालफितीत बंद करून ठेवण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वास्कोत मोठ्या समारंभपूर्वक पायाभरणी केलेले तीन प्रकल्प अद्याप पूर्ण होत नाही.वरुणापूरी ते सडा पर्यंत मुरगाव बंदराला जोडणाऱ्या चौपदरी महामार्गावरील उड्डाणपूल गेल्या सहा वर्षांपासून पूर्ण होत नाही.बायणा ते पणजी या सागरी मार्गावर श्री.गडकरी यांच्या हस्ते सुरू केलेली फेरीबोट सेवा अवघ्या तीन महिन्यांत बंद झाली ती दोन वर्षे झाली तरी अद्याप सुरू होत नाही आणि वास्को मच्छिमारी जेटी उभारण्याचे नामोनिशाण मिटले आहे.फक्त पायाभरणी करायची आणि ते प्रकल्पच पूर्ण करु नये असे प्रकार वास्कोत वाढले आहेत.


वास्कोत मच्छिमारी जेटीची नितांत आवश्यकता आहे.पण त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.आत्ताची जेटी एमपीटीच्या धक्क्यावर चिंचोळ्या जागेत आहे.वास्कोत जवळपास दिडशे ट्राॅलर आहेत त्यांच्यासाठी विद्यमान अवस्थेत असलेली जेटी डोकेदुखी बनली आहे.बकाल अवस्थेतील जेटी नव्याने बांधून द्यावी अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून वास्कोतील मच्छिमारी व्यवसायीक करीत आले आहेत पण,प्रत्येकवेळी आश्वासनापलिकडे काहीच मिळाले नाही अशी खंत मच्छिमाऱ्यांची आहे.


केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेतून वास्कोतील मच्छिमारी जेटी बांधण्यासाठी पायाभरणी करण्यात आली तेंव्हा मच्छिमारी ट्राॅलर मालक बरेच आनंदीत झाले होते पण त्यांचा आनंद द्विगुणित अद्याप करता आला नाही.१३० कोटी रुपये खर्चाची मच्छिमारी जेटी बांधण्यासाठी कोणतीच हालचाली अद्याप सुरू झालेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com