बाळ्ळी-अडणे पंचायतीच्या सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

राजू गोसावी, अविनाश वेळीप, दीपाली फळदेसाई, वंदना गावकर व रघुनाथ देयकर या पाच पंच सदस्यांनी अविश्वास ठरावावर सह्या केल्या आहेत. बाळ्ळी - अडणे पंचायत नऊ सदस्यांची असून सरपंच राजेश देसाई विकासकामांत भेदभाव करतात, पाच सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, बेकायदेशीर बाधकामांना प्रोत्साहन देतात, विकासकामे हाती घेण्यात अपयशी ठरले आहेत अशी कारणे अविश्वास ठरावाच्या नोटिशीत दिली आहेत.

कुंकळ्ळी- बाळ्ळी-अडणे पंचायतीचे सरपंच राजेश फळदेसाई यांच्या विरोधात पाच पंच सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. त्यामुळे राजेश फळदेसाई व उपसरपंच दोघांनाही पदावरून पायउतार होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

राजू गोसावी, अविनाश वेळीप, दीपाली फळदेसाई, वंदना गावकर व रघुनाथ देयकर या पाच पंच सदस्यांनी अविश्वास ठरावावर सह्या केल्या आहेत. बाळ्ळी - अडणे पंचायत नऊ सदस्यांची असून सरपंच राजेश देसाई विकासकामांत भेदभाव करतात, पाच सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, बेकायदेशीर बाधकामांना प्रोत्साहन देतात, विकासकामे हाती घेण्यात अपयशी ठरले आहेत अशी कारणे अविश्वास ठरावाच्या नोटिशीत दिली आहेत.
बाळ्ळी पंचायतीवर निष्ठावान भाजप सदस्याची वर्णी लागणार असल्याचा दावा काही पंच सदस्यांनी केला आहे. यावेळी महिलेच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडण्याची शक्यता आहे. काही पंच सदस्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे राजेश फळदेसाई यांनी एकच वर्ष सरपंचपद भूषविणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासनाला जागले नसल्यामुळे त्यांच्यावर अविश्वास ठराव आणावा लागल्याचे एका पंच सदस्याने सांगितले. अविश्वास ठराव दाखल केलेले पंच सदस्य भाजपचे समर्थक असून बाळ्ळी पंचायतीवर भाजपचा झेंडा फडकावणार अशी चिन्हे दिसत आहेत.

संबंधित बातम्या