भारतातील खवय्यांसाठी खूशखबर...मांसाहारी इडलीची चव चाखता येणार गोव्यात

Nonvegetarian Idli can be tasted in Goa
Nonvegetarian Idli can be tasted in Goa

पणजी: दक्षिण भारतातील इडली सांभार हा शुद्ध शाकाहारी खाद्य पदार्थ सर्वपरिचित आणि तेवढाच आवडीचा ठरला आहे, मात्र भारतात पहिल्यांदाच मांसाहारी इडली गोव्यात  जीएसबी रिसर्च प्रा. लि.,तर्फे सोमवारी मिरामार येथे  मेरियट रिसॉर्ट लाँच करण्यात आली. 


मांसाहारी केवळ पारंपरिक पांढऱ्या रंगात व एकाच आकारात नसेल तर ही इडली विविध आकारात, रंगात, विविध प्रकारात असेल. ‘ओह इडली’ ब्रँडच्या रुपात ती प्रथम उत्तर गोव्यात व नंतर संपूर्ण गोव्यात उपलब्ध होईल. जिएसबी रिसर्च अॅण्ड कॅन्सलटिंग लि.,चे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरब सरकार, ओह इडलीच्या उद्योजिका गार्गी चौधरी तसेच ॲड. योगेश नाईक व शेफ सुनीत शर्मा यांच्या हस्ते हे लाँचिंग झाले.


गौरब सरकार म्हणाले, ज्या गोमंतकीय ‘स्टार्टअप’ना मोठे व्हायचे आहे त्यांचे आम्ही नेहमीच स्वागत करू. जिएसबीने कोविड महामारी काळात गोव्यातील ओह इडलीच्या उद्योजिका गार्गी चौधरी यांचे सशक्तीकरण केले आहे याचा आनंदआहे. मांसाहारी इडलीची संकल्पना भारतात प्रथमच आम्ही राबविली आहे आणि त्याची सुरवात गोव्यातून होत आहे. ही इडली बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच नक्की आवडेल याबद्दल आम्हाला खात्री आहे.

जीएसबी  एकोसिस्टम हे एक टुल असून ते कोणत्याही क्षेत्रातील स्टार्टअप समस्यांचे निराकारण करतील.मार्केट सतत बदलत आहे आणि प्रत्येकजण काहीतरी नवीन व कल्पक करण्याच्या प्रयत्नात आहे. या स्पर्धात्मक बाजारात टिकून रहायला जीएसबी एकोसिस्टम मदत करील.


गार्गी चौधरी म्हणाल्या, सध्याच्या डिजिटल युगात व कोविडच्या परिस्थितीत क्लाऊड किचन चे महत्त्व वाढले आहे. लोक घरातून फूड डिलिव्हरी एपच्या माध्यमातून आमचे अन्नपदार्थ मागवू शकतात. आमचे बेज किचन बार्देस मध्ये असेल व नजीकच्या काळात आम्ही क्युएसआर सुरू करणार आहोत. येथे स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात बनवलेले पदार्थ टेकअवे पद्धतीने नेता येतील शिवाय आम्ही हे पदार्थ फूड व्हॅनद्वारे गोव्यातील महत्वाच्या समुद्र किनाऱ्यावर उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे पर्यटकांनाही त्याचा आस्वाद घेता येईल.

अनेक जण शकाहारी इडली खात नाहीत त्यांना मांसाहारी इडलीची चव चाखता यावी यासाठी ओह इडली ची संकल्पना प्रत्यक्षात आणली. आमचे अन्नपदार्थ बनवताना उच्च दर्जाचे अन्न घटक वापरतो. ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड आम्हाला मान्य नाही. गोवा सर्वोत्तम पर्यटन स्थळ आहे. इथले लोक खाण्याचे शौकीन आहेत हे हेरून मी अन्न क्षेत्रात सुरवात (स्टार्टअप) करण्याचा निर्णय घेतला.


तुमच्या व्यापाराचे योग्य नियोजन करण्यासाठी तज्ज्ञांकरवी मार्गदर्शन व तुमचा ब्रॅण्ड बनविण्यासाठी जीएसबी एकोसिस्टम टीम तुमच्या दारात हजर असेल अशी ग्वाही यावेळी गौरब सरकार यांनी दिली. शेफ सुनीत शर्मा म्हणाले,मी १८ वर्षे अन्न पदार्थ बनविण्याच्या क्षेत्रात आहे. थोडं वेगळं तंत्र वापरून नवीन काही देता येते. ओह इडली खाल्यानंतर तुम्हाला नक्कीच सुखद धक्का बसेल. पेपर चिकन इडली, गन पावडर डिस्को इडली, चॉकलेट इडली असे वेगवेगळे प्रकार तुम्हाला आम्ही खायला देवू.
ॲड. योगेश नाईक म्हणाले, मला ही कल्पना आवडली आणि मीही यात सामील झालो. सर्व कायदेशीरबाबी पूर्ण केल्या. ‘ओह इडली’ हा सर्वांसाठी निश्चितच वेगळा अनुभव असेल.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com