उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका यांची दिल्लीत बदली

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 5 जानेवारी 2021

उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका (आयएएस) यांची दिल्ली येथे तर विदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाचे पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज (आयपीएस) यांची अरुणाचल प्रदेश येथे बदली झाली आहे

पणजी: उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका (आयएएस) यांची दिल्ली येथे तर विदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाचे पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज (आयपीएस) यांची अरुणाचल प्रदेश येथे बदली झाली आहे.

या दोघा अधिकाऱ्यांच्या जागी स्वेतिका सचन (आयएएस) व पोलिस अधीक्षक अभिषेक धानिया (आयपीएस) यांची गोव्यात बदली झाली आहे. गृह मंत्रालयाने देशातील आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश काढला आहे त्यामध्ये याचा समावेश आहे.

आणखी वाचा:

गोवा सरकारने IIT प्रकल्प होणारच असा घेतला पवित्रा...पण! -

संबंधित बातम्या